MLA Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Alex Sequeira: सिक्वेरांसमोर कोळसा वाहतुकीसह नव्या बोरी पुलाचेही आव्‍हान

Alex Sequeira: आलेक्‍स सिक्‍वेरा यांना प्रमोद सावंत मंत्रिमंडळात स्‍थान मिळाल्‍याने प्रथमच या मंत्रिमंडळात सासष्‍टीला स्‍थान प्राप्‍त झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Alex Sequeira: आलेक्‍स सिक्‍वेरा यांना प्रमोद सावंत मंत्रिमंडळात स्‍थान मिळाल्‍याने प्रथमच या मंत्रिमंडळात सासष्‍टीला स्‍थान प्राप्‍त झाले आहे. अशा परिस्‍थितीत सासष्‍टीच्‍या लोकांच्‍या भावना सिक्‍वेरा किती प्रमाणात जाणून घेऊन त्‍यांची पूर्ती करु शकतील हाच मोठा प्रश्‍न असून कोळसा वाहतुकीला असलेला विरोध आणि नव्‍या बोरी पुलासाठी सध्‍या सुचविलेल्या मार्गाला विरोध या दोन प्रश्‍नावर ते किती प्रभावीपणे तोडगा काढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. किंबहुना हे दोन प्रश्‍न सिक्‍वेरा यांच्‍यासाठी आव्‍हाने ठरणार आहेत.

राजकीय विश्‍लेषक क्‍लिओफात आाल्‍मेदा कुतिन्‍हो यांना विचारले असता, साष्‍टीकरांची मते किती प्रभावीपणे ते भाजप नेतृत्‍वापर्यंत पोहोचू शकतात, यावरच या तालुक्‍यात त्‍यांची लोकप्रियता ठरणार आहे. कोळसा वाहतुकीला विरोध, शेत जमिनी राखून ठेवून काँक्रीटीकरणाला विरोध, सरकारसाठी महत्त्वाचा असलेला रेल्‍वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध आणि पर्यावरणाचे रक्षण ह्या साष्‍टीच्‍या प्रमुख मागण्‍या आहेत. आणि जर सिक्‍वेरा साष्‍टीचे खरेच प्रतिनिधित्‍व करत असतील तर याबाबत केंद्रीय नेतृत्‍वाला राजी करुन त्‍यावर तोडगा काढणे हेच त्‍याचे आद्य कर्तव्‍य असेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

स्‍वत: राजकारणी असलेले आणि राजकीय विश्‍लेषक ॲड. राधाराव ग्रासियस यांना विचारले असता, नव्‍या बोरी पुलासाठी जो मार्ग निश्‍चित केला आहे, त्‍याला स्‍थानिक विरोध करीत आहेत आणि महत्त्वाचे म्‍हणजे हा मार्ग सिक्‍वेरा यांच्‍या नुवे मतदारसंघातून जातो. सिक्‍वेरा मंत्री झाल्‍याने या मार्गावर तोडगा काढावा, अशी स्‍थानिकांची इच्‍छा असणे साहजिक आहे. आता सिक्‍वेरा त्‍यावर तोडगा कसा काढतील, याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे असे ते म्‍हणाले.

बाणावली ते मुंगूल इथपर्यंतचा रस्‍ता साळ नदीत मातीचे भराव घालून तयार केल्‍याने पावसात या ठिकाणी निश्‍चितच पुराची स्‍थिती निर्माण होणार. आता त्‍यावर सिक्‍वेरा कसे उपाय काढतील, हे पहाणे गरजेचे आहे, असे ॲड. ग्रासियस म्‍हणाले.

`गोंयांत कोळसो नाका’चे काय?

‘गोंयांत कोळसो नाका’ या संघटनेचे सहनिमंत्रक असलेले पर्यावरण कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई यांना त्‍यांचे मत विचारले असता ते म्‍हणाले, कोळसा वाहतुकीला विरोध करण्‍यासाठी आम्‍ही जे आंदोलन केले होते त्‍या आंदोलनात स्‍वत: सिक्‍वेरा सामील होते. आताही त्‍यांची तीच भूमिका असेल असे आम्‍हाला वाटते. त्‍यांनी ती भूमिका पुढे न्‍यावी, अशीच आमची इच्‍छा आहे असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याचा परवाना निर्णयाविरुद्ध संताप

Goa TET 2025: शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत 'विवाहबाह्य संबंधांवर' उतारा, परीक्षार्थी संतप्त; समाज माध्यमांवर उठली टीकेची झोड

Goa Drug Bust: गोवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 1 कोटींच्या अंमली पदार्थासह बेलारुसच्या महिलेला अटक; तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Illegal Nightclubs Goa: गोव्यातील नाईट क्लब, डान्सबार अन् डिस्कोथेक बेकायदेशीर, राज्याच्या कायद्यात तरतूदच नाही; बड्या अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ

Arpora Nightclub Fire Case: 25 मृत्यूंची गंभीर दखल! हडफडे दुर्घटनाप्रकरणी मानवाधिकार आयोगाची मोठी ॲक्शन; मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालकांना समन्स

SCROLL FOR NEXT