Goa Politics: नोकरभरती घोटाळ्‍यावर विरोधकांचे मौन का?

Goa Politics: नेटकऱ्याचा प्रश्‍न सगळेच आमदार सामील असल्‍याचा आरोप
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Recruitment Scam: सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे, हे प्रथमदर्शनी सरळ सरळ दिसू्न येत असतानाही सरकारच्‍या प्रत्‍येक गोष्‍टीत भ्रष्‍टाचार आणि घोटाळा शोधून काढणारे विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते केवळ याच बाबतीत मूग गिळून गप्‍प का?

गोव्‍यातील समाज माध्यमांवरून हा प्रश्‍न विचारला जात असून विरोधकांकडून मात्र अजून त्‍यावर समर्पक असे उत्तर पुढे येत नाही.

Goa Assembly
Goa Politics: नवे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पर्यावरण तसेच कायदा व न्याय ही खाती येणार

नोकर भरती करताना जी नेहमीची पद्धती वापरली जाते, त्‍याला यावेळी परस्‍पर फाटा दिला गेला. लेखी परीक्षा झाल्‍यानंतर उमेदवारांची तोंडी परीक्षा घेऊन नंतरच उमेदवारांची निवड होते.

मात्र यावेळी कुणाचीही तोंडी परीक्षा घेतलेली नाही. हे उमेदवार निवडताना बऱ्याच प्रकरणात पैशांचे मोठे व्‍यवहार झाले, असे आरोप होत आहेत.

तरीही ही नोकरभरती विरोधकांना घोटाळा का वाटत नाही. यावर उत्तर देताना मडगावातील आरटीआय कार्यकर्ते संजीव रायतुरकर म्हणतात, नेत्यांनी उत्तर दिलेच पाहिजे. अशा घोटाळ्‍यात राज्‍यातील चाळीसही आमदार सामील असतात, त्‍यावेळी अशा घोटाळ्‍यावर ते आवाज काढणार तरी कसे?

कुठल्‍याही आमदाराने आवाज काढू नये, यासाठी प्रत्‍येक आमदाराला तीन जागा दिल्‍या गेल्‍या आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. ही माहिती खरी असल्‍यास या घोटाळ्‍यावर ते आवाज काढतील तरी कसे? असा सवाल त्‍यांनी केला.

Goa Assembly
Margao News: व्यापाऱ्यांच्या हितासाठी बाबू उतरले आखाड्यात

आपचे राज्‍य प्रवक्‍ते सिद्धेश भगत यांनी याबाबत मत व्‍यक्‍त करताना, सध्‍या गोव्‍यातील भाजप सरकारात एवढी गर्दी वाढली आहे, की सत्ताधारी गटातच आता विरोधक तयार झाले आहेत. सत्ताधारी गटातील भानगडी बाहेर काढण्‍यासाठी हे सत्ताधारी गटातील विरोधकच पुरेसे आहेत.

त्‍यामुळे विरोधकांना आवाज काढण्‍यासाठी ते जागा ठेवत नाहीत. याही बाबतीत तसेच आहे. हा जो तथाकथित घोटाळा झाला आहे, तो बाहेर सत्ताधारी गटानेच काढलेला आहे, असे ते म्‍हणाले.

आरजीचे दक्षिण गोवा अध्‍यक्ष तिओतिन डिकॉस्‍ता यांनी, या नोकर भरतीत घोटाळा आहे. यासाठीच नीलेश काब्राल यांचा राजीनामा भाजप पक्षश्रेष्‍ठीने मागून घेतला आहे, ही स्‍पष्‍ट बाब आहे.

जर तसे नसते तर दुसऱ्या एका आमदाराला मंत्री करण्‍यासाठी प्रमोद सावंत सरकारातील तिसऱ्या क्रमांकांच्‍या मंत्र्याला वगळले गेले नसते.

काब्राल यांच्‍यापेक्षाही कित्‍येक कनिष्‍ठ या मंत्रिमंडळात आहेत. त्‍यामुळे घोळ झाला म्‍हणूनच काब्राल यांना काढले, असे म्‍हणता येते. आता विरोधक का आवाज काढत नाहीत. त्यामुळे तेही यात सामील असावेत, असेच म्‍हणावे लागेल, असे ते म्‍हणाले.

मुख्‍य अभियंत्‍यावर कारवाई कधी?

सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे प्रधान मुख्‍य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्‍यावर कारवाई कशी झाली नाही? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते श्रीराम रायतुरकर यांनी केली आहे.

ते म्‍हणाले, दीपक पाऊसकर हे या खात्‍याचे मंत्री असताना घोळ झाला होता, त्‍यावेळीही खात्‍याचे प्रमुख पार्सेकर हेच होते. मात्र तेव्‍हाही त्‍यांना मोकळे सोडताना एका वर्षाने सेवे मुदतवाढ दिली.

आता पुन्‍हा घोळ झाला आहे आणि त्‍याच पार्श्‍वभूमीवर जी बातमी पुढे येते, ती म्‍हणजे पार्सेकर यांना आणखी एक वर्ष सेवावाढ मिळणार आहे. असे घोळ केल्‍यावरच सेवावाढ मिळते का? असा सवाल रायतुरकर यांनी केला.

राज्‍याचे दक्षता विभागाचे प्रमुख असलेले मुख्‍य सचिव काय करतात, असा सवाल करून एवढा मोठा गोंधळ झालेला असताना त्‍यांनी स्‍वत:हून पुढे येऊन या उत्तरपत्रिका अजून ताब्‍यात कशा घेतल्‍या नाहीत, असा सवाल करून याबाबतीत तेही अकार्यक्षम आहेत का? असा सवाल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com