Gym:  Dainik Gomantak
गोवा

Gym: व्‍यायामशाळेचे ‘सिलिंग’ कोसळले; अनर्थ टळला

Gym: वास्को येथील टिळक मैदानावरील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्‍या (साग) व्यायामशाळेचे सिलिंग कोसळले.

दैनिक गोमन्तक

Gym:

वास्को येथील टिळक मैदानावरील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्‍या (साग) व्यायामशाळेचे सिलिंग कोसळले. मात्र सुदैवाने त्‍यावेळी व्यायामशाळा बंद होती, त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. ‘साग’तर्फे ही व्यायामशाळा दुरूस्त करण्‍याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले होते.

परंतु गेली दोन वर्षे या आश्‍‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्‍यामुळे युवकांनी संताप व्‍यक्त केला आहे. सदर व्यायामशाळेचे सिलिंग सकाळी कोसळले तेव्‍हा ती बंद होती. सिलिंग पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत होते.

व्‍यायामशाळा सुरू असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. व्‍यायामशाळेच्‍या छपराची दुर्दशा झाली असून, त्‍याची दुरुस्‍ती करावी अशी मागणी वारंवार करण्‍यात आली. पण त्‍याकडे दुर्लक्षच करण्‍यात आले. म्‍

हणूनच आजची घटना घडली, असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. दरम्‍यान, व्यायामशाळेचा एक भाग वातानुकूलित करून देण्‍याचे आश्‍‍वासनही ‘साग’च्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

पण तेही पूर्ण झालेले नाही. वास्कोत एकच सरकारी व्यायामशाळा असून राज्य क्रीडा प्राधिकरणाने ती त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी स्‍थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT