New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Goa new gas connections: घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्यानंतर महिनाभरात तब्बल ११ हजार जणांनी नव्याने गॅस जोडणी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
New Gas Connection
New Gas ConnectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्यानंतर महिनाभरात तब्बल ११ हजार जणांनी नव्याने गॅस जोडणी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी गॅस सिलिंडरचे बुकिंग एजंटला फोन करून केले जात असे आणि साधारण आठवडाभरात सिलिंडर घरपोच दिला जात असे.

मात्र, मागणी वाढल्याने वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब केला. त्यानुसार मिस्ड कॉल, एसएमएस, आयव्हीआरएस आणि ॲपद्वारेच बुकिंग स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले.

New Gas Connection
Goa Drug Case: शाळेजवळ ड्रग्स विक्री; केरळच्या युवकाला अटक, अमलीपदार्थ विरोधी पथकाची मांद्रे येथे कारवाई

‘ओटीपी’मुळे कोंडी

गॅस सिलिंडर घरपोच मिळण्यासाठी ओटीपी देणे सक्तीचे करण्यात आले. पूर्वी केवळ ३२ टक्के ग्राहक ओटीपी देऊन सिलिंडर घेत होते; आता हे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे. या उपाययोजनांमुळे काळाबाजाराला आळा बसला असून साठेबाजांची कोंडी झाली आहे.

परिणामी, अनधिकृत मार्गाने सिलिंडर मिळवण्याऐवजी ग्राहकांना कायदेशीररित्या गॅस जोडणी घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com