Flood in Sattari Dainik Gomantak
गोवा

Flood : महापुराच्या कारणांचा अभ्यास करावा! पुन्हा धोका शक्य

ॲड. देसाई : सत्तरी तालुक्यातील 2021 सालच्या दुर्घटनेचे सत्य उघड करा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Flood : सत्तरी तालुक्यात जुलै 2021 मध्ये म्हादई नदीला प्रचंड महापूर आला होता. त्यामुळे जनतेचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते; पण या महापुराच्या कारणांचा अद्याप अभ्यास का झाला नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई यांनी केला आहे.

देसाई म्हणाले की, जुलै 2021 मध्ये सत्तरी तालुक्यात महापूर आला, त्याच्या आदल्या दिवशी प्रचंड पावसाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुराला प्रारंभ झाला. परंतु 2008 साली जेव्हा सत्तरी तालुक्यात पूर आला, त्यावेळी 15 दिवस सतत पाऊस पडला आणि नंतर पूर आला.

वास्तविक आज म्हादई नदीचा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. त्याचा तज्ज्ञांमार्फत दस्तावेजही तयार करायला हवा; परंतु याचे गांभीर्य आज कोणालाही दिसून येत नाही.

सरकारने म्हादई नदीबाबत समितीचे गठन केले आहे खरे; परंतु या समितीने सत्तरी तालुक्यात येऊन म्हादई नदीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्यात पुन्हा पूर येऊ शकत नाही, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

अतिरिक्त पाणी सोडल्याचा संशय

2021 साली जेव्हा पूर आला, तेव्हा म्हादई नदीचे पात्र मोठे झाले होते. त्यामुळे एकच दिवस पाऊस पडल्यावर अचानक महापूर कसा काय येऊ शकतो, याचा अभ्यास होणे आवश्यक होते; परंतु तो झालाच नाही.

जेव्हा महापूर आला, तेव्हा पाणी अत्यंत शीघ्र गतीने म्हादई नदीपात्रातून पुढे सरकत होते, याचा अर्थ 2021 साली कोणीतरी वरून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते कर्नाटक राज्यदेखील असू शकते, असे देसाई म्हणाले.

"काही तथाकथित राजकारणी म्हादई नदीचा अभ्यास करण्याआधीच बोलत आहेत. त्यांना सर्व काही माहीत आहे, असे ते भासवत आहेत. सत्तरी तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच आणि पंचांनी स्वतः म्हादई नदीची परिक्रमा करायला हवी आणि तिचा अभ्यास करायला हवा."

- ॲड. शिवाजी देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT