पर्वरीत पार्किंगसह विकासकामे सुरू : मंत्री खंवटे

पुंडलिक नगरात दिव्यांगांसाठी खास सुविधा
Rohan Khaunte laid foundation stone for the developmen
Rohan Khaunte laid foundation stone for the developmenDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरीत पार्किंगसह दिव्यांगासाठी खास झोपाळा व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, तसेच बॅटमिंट कोर्ट सारख्या सुविधाही उपलब्ध होणार आहे. खुल्या जागेचा योग्य वापर होईल, असे खंवटे यांनी विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.

पर्वरी पुंडलिक नगरातील दोन खुल्या जागेचा गोवा पर्यटन खाते व गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे विकास करण्यात येणार असून या विकास कामांचा आज सकाळी अकरा वा. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या शुभारंभ करण्यात आला.

Rohan Khaunte laid foundation stone for the developmen
Crime News : सांगोल्डा चोरीप्रकरणी हॉटेल कामगारास अटक

खुल्या जागा विकसित करणे म्हणजे फक्त पेवर्स टाकून वॉकिंग ट्रॅक करणे नाही. येथील लोकवस्तीचा अभ्यास करून, गरजेप्रमाणे त्यात बदल करण्यात येतो. या अनुषंगाने, नाना-नानी, नातवंडे पार्क, आर्ट पार्क, सायन्स पार्क अशा प्रकारे पार्क तयार केले आहेत.

लोकसंख्या वाढते, तसतसे गरजेचे स्वरूप बदलत असते. पार्किंगसाठी जागा आणि मागणीप्रमाणे बॅडमिंटन कोर्ट व पार्किंगची जागा तयार करण्यात येईल, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

जीटीडीसी चेअरमन गणेश गावकर, दिव्यांगायुक्त गुरुप्रसाद पावसकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, पर्वरी मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, अंबिका कामत, नारायण चोडणकर, जिल्हा परिषद सदस्य कविता नाईक, पेन्ह-द-फ्रान्सचे पंचायतीचे सरपंच स्वप्निल चोडणकर, व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Rohan Khaunte laid foundation stone for the developmen
CRZ Goa: शॅकधारकांकडून ‘सीआरझेड’चे उल्लंघन, नियम धाब्यावर

शिरीष सहस्त्रबुद्धे म्हणाले, सदर प्रकल्प दिव्यांग मुलांसाठी असून यात व्हीलचेअरवर झोपाळा, मेरी गो राऊंडवर व्हीलचेअर, स्लाईड झिंक अशा अनेक सुविधा या पार्कमध्ये असणार आहे.

विकासकामांची पायाभरणी

पुंडलिक नगरातील क्लॉक टॉवर जवळच्या गाडगे महाराज सभागृहाजवळ असलेल्या खुल्या जागेत बॅडमिंटन कोर्ट, पार्किंगसाठी जागा व बसण्याची व्यवस्था आणी पुंडलिक देवस्थान जवळच्या खुल्या जागेत दिव्यांगांसाठी खेळण्यासाठी झोपाळा व इतर सुविधा खास पद्धतीने विकसित करण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com