राज्य कदंबवाहतूक मंडळातर्फे गौरव करण्यात आलेल्या बस चालक, कंडक्टर समवेत आमदार कार्लुस आल्मेदा, डेरीक नेटो, संजय घाटे, दीपक नाईक व इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्य कदंबवाहतूक मंडळातर्फे बस चालक, कंडक्टर यांचा गौरव करण्यात आला

कदंब बसकंडक्टर व चालक यांनी एका मुलीची पर्स प्रामाणिकपणे तिला पुन्हा परत केल्या बद्दल दोघेही अभिनंदनास पात्र ठरले.

दैनिक गोमन्तक

Goa: कदंब बसकंडक्टर व चालक यांनी एका मुलीची पर्स प्रामाणिकपणे तिला पुन्हा परत केल्या बद्दल दोघेही अभिनंदनास पात्र ठरले आहे. चतुर्थीच्या दिवसात कदंबच्या कामगारांनी चांगले काम केल्याने मला विदेशातून अनेकांनी फोन करून कदंब मंडळाचे कौतुक केले. मंगेश गावकर, राजेश उपसकर यांचे कार्य समाजाला दिशा दाखवणारे आहे. आज तुमच्या प्रामाणिकपणामुळे एका मुलीचे दागिने तसेच रोख रक्कम त्या मुलीला पुन्हा मिळाली आहे. कदंबने आपली सेवा गेल्या चाळीस वर्षापासून प्रामाणिक पणाने केली असल्याचे प्रतिपादन आमदार तथा राज्य कदंबा वाहतूक मंडळाचे अध्यक्ष कालुर्स अल्मेदा यांनी केले.

वास्को येथील कदंब बसस्थानकावर राज्य कदंबा वाहतूक मंडळातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. चतुर्थीदिनी एका मुलीची पर्स बसमध्ये राहिली होती. तेव्हा कदंब बसवर कामावर असलेले चालक, कंडक्टर यांनी त्या मुलीची ती पर्स व्यवस्थित रित्या तिच्याकडे पोचणार याची खबरदारी घेतली व ती पर्स संबंधित मुलीला प्रामाणिकपणे परत करण्यास पुढाकार घेतला व ती पर्स त्या मुलीला परत केली होती. यासाठी बस कण्डक्टर मंगेश भिकु गावकर वाडे सांगे, चालक राजेश उपसकर नेत्रावळी सांगे यांचा गौरव आमदार तथा राज्य कदंबा वाहतूक मंडळाचे अध्यक्ष कालुर्स अल्मेदा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो, सर व्यवस्थापक संजय घाटे, उपाध्यक्ष दीपक नाईक, वास्को सहाय्यक डेपो प्रमुख अँड्रु परेरा, मडगाव सहाय्यक डेपो प्रमुख गिरीश गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

वास्को कदंब बस स्थानक परिसराची झालेली दुरवस्था.

यावेळी कदंब बसस्थानकाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की वास्को कदंबबस स्थानकाचे नवीन इमारतीचे कामाचे फायलिंगचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तर डेपोचे फायलिंगचे काम शंभर टक्के होऊन सुद्धा कंत्राटदार काम करण्यास पुढाकार घेत नाही. कंत्राटदाराला पूर्ण रक्कम देऊन सुद्धा तो कामाला गती देत नाही. सदर कंत्राटदाराला 4 कोटी रक्कम जास्त मिळून सुद्धा तो काम करीत नाही.ही सत्य परिस्थिती आहे.उलट माझ्यावर आरोप होत आहे. निवडणूका जवळ आल्याने विरोधकांना माझ्यावर आरोप करण्यासाठी फक्त कदंब बसस्थानक तेवढेच डोळ्यासमोर दिसत आहे.

कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांनी बोलताना आपल्या भाषणात राज्य कदंब वाहतूक मंडळाचा वास्को येथे बांधण्यात येणाऱ्या बसस्थानक इमारतीचा कंत्राटदाराला पूर्ण रक्कम देऊन सुद्धा तो काम करण्यास असमर्थ पणा दाखवत आहे. सदर कंत्राटदाराला निम्म्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊन सुद्धा तो काम करीत नसल्याने याचे खापर वास्कोचे आमदार तथा कदंब महामंडळाच्या अध्यक्षावर फोडून नको ते आरोप करणे एकदम चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना उपाध्यक्ष दीपक नाईक म्हणाले की राज्य कदंब वाहतूक मंडळाच्या वास्को येथील बस स्थानक इमारतीचे काम अर्धवट राहण्यास पूर्णपणे कंत्राटदार जबाबदार आहे. या कंत्राटदाराला निम्म्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊन सुद्धा त्याने काम अर्धवट रित्या सोडून दिलेले आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आज वास्को कदंब बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे जात नाही. बसस्थानकाचे काम होण्यासाठी अध्यक्षा मार्फत २५ पेक्षा जास्त बैठका कंत्राटदार व राज्य साधनसुविधा विकास मंडळा बरोबर झालेली आहे. एवढे करून सुद्धा कंत्राटदार काम करण्यास असमर्थता दाखवत आहे. कदंब बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने उगाचच आमदारावर आरोप करणे एकदम चुकीचे आहे. आरोप करण्यापेक्षा कदंब बसस्थानकाचे काम का होत नाही याची माहिती जाणुन घेणे गरजेचे आहे. असा टोला उपाध्यक्ष नाईक यांनी शेवटी मारला.

या वेळी राज्य कदंब वाहतूक मंडळातर्फे वास्को येथील कदंब चालक कृष्णा पिळर्णकर यांच्या चांगल्या कार्याबद्दल आमदाराच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक सरव्यवस्थापक संजय घाटे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपाल शिरोडकर तर आभार प्रदर्शन तृप्ती नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT