Goa Politics 
गोवा

Goa Politics: आयाराम-गयारामाचा पक्ष

Goa Politics: सुदिन ढवळीकर जंटलमन, पण कार्यकर्त्यांकडून अशी उत्तरे आली तर मग पुढे काय हो!

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कवळे पंचायतीत सुदेश भिंगी यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली, खरी पण मगोवाले भाजपवरच घसरले. या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाला आयाराम गयारामांचा पक्ष असल्याचे सरळ संबोधून घोटाळेबाजांना सावरणारा हा पक्ष असल्याचा आरोप मगो कार्यकर्त्यांनी केला.

मात्र भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षावर आरोप करताना मागच्या काळात मगो पक्षाने भाजपशी युती केली होती, त्याची आठवण पत्रकारांनी दिली, त्यावर हा इतिहास, पुढचे पुढे बघू असे उत्तर देणाऱ्या मगो कार्यकर्त्यांना पत्रकारांनी चांगलेच कात्रीत पकडले. याचा अर्थ कुणीही काहीही घोटाळे केले तर भाजपमध्ये गेल्यानंतर ते निस्तरले जातात का, असा सवाल करून येत्या निवडणुकीत भाजपसोबत मगोने पुन्हा युती केली तर तुमची भूमिका काय असेल, तुम्ही विरोध कराल काय, असे विचारले असता, मगो कार्यकर्त्यांकडून सारवासारव करण्यात आली. सुदिन ढवळीकर जंटलमन, पण कार्यकर्त्यांकडून अशी उत्तरे आली तर मग काय हो... पुढे...! ∙∙∙

दरम्यान गोव्यात एका पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात जाणारे जे आयाराम-गयाराम आहेत, त्यांना कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षाकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष युती करणार नाही. काँग्रेस पक्षाने अशा उमेदवारांना उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस बरोबरही युती करणार नसून राज्यात आयाराम-गयाराम व्यवसाय बंद केला पाहिजे, असे मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

कोरोना पार्श्वभूमिवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन तसेच कर्फ्यूचा फटका गोमंतकीय मोटरसायकल चालक, रिक्षा चालक, कलाकार आदींना बसलेला असून कलाकारांना सरकारने दोन वर्षाचे मिळून दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, ते योग्य नाही. त्यांना दर महिन्याला चार हजार व मागच्या दोन वर्षाचे पैसे सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी सुदिन ढवळीकर यांनी केली.

या सरकारने फक्त लोकांना आश्वासने देण्याचे काम केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चार महिन्यात गोव्यातील सर्व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. आपण जेव्हा मंत्री होतो, तेव्हा केंद्र सरकारकडून १५ हजार कोटी रुपये आणले. या पैशाचा वापर करून आज गोव्याचा विकास साधण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोंड्यात भाटीकर!

मगो पक्षाचे युवा नेता केतन भाटीकर हे फोंडा मतदारसंघात योग्यरीत्या काम करीत असून भाटीकर यांना फोंडा मतदारसंघात मगो पक्षाची उमेदवारी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मगो पक्षाचा फोंडा मतदारसंघ हा पाया असून फोंड्यात केतन भाटीकर असो किंवा अन्य कुणीही असो, त्यांना कशाप्रकारे निवडून आणावे, हे आम्हाला माहीत आहे, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT