Goa Ganesh Chaturthi 2022 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi : नेहमी चिकणमातीच्याच श्रीमूर्तीचे पूजन करण्याचं मूर्तीकारांचं आवाहन

‘पीओपी’च्या मूर्ती टाळण्यासाठी आसोलकर बंधूंची सर्वसामान्यांना साद

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi : निसर्गपूजा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी गणेशभक्तांनी केवळ चिकण मातीपासून केलेल्या गणेश मूर्तीचे पूजन करावे. जेणेकरून मातीची अर्थात निसर्गाची सेवा करू शकतो, असे मत दांडोसवाडा मांद्रे येथील 55 वर्षापासूनची गणपतीची चित्रशाळा चालवणाऱ्या श्याम, राम आणि अनिल असोलकार या तिघा बंधूंनी व्यक्त केले.

बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. अनिल आसोलकर म्हणाले, की गणेशभक्तांच्या मागणीनुसार मूर्ती बाजारात उपलब्ध केल्या जातात. आज-काल प्रत्येक गणेश भक्ताला वजनाने हलकी मूर्ती हवी असते. त्यानुसार पीओपी मूर्ती खरेदी केल्या जातात. परंतु त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना आम्ही बघत आहोत. निदान आता तरी यापुढे तरी गणेशभक्तांनी केवळ चिकण मातीच्या मूर्तीची पूजा करून निसर्ग पूजा करावी.

अनिल पुढे म्हणाले,की वडिलांकडून तसेच मोठे बंधू श्याम आणि राम यांच्याकडून आपण गणेश मूर्ती बनवण्याचे पूर्ण मार्गदर्शन घेतल्याने तेच आपले या कलेतील गुरू आहेत. वडिलांची गणपतींची चित्रशाळा आमोणा उजगाव आणि मांद्रे येथे होती. परंतु आता दांडोस वाडा, मांद्रे येथील दामोदर गणपतीची चित्रशाळेतच आम्ही मूर्ती बनवतो. आणि आजही आमोणा उसगाव, तिस्क या भागातील गणेशभक्त येथून मूर्ती पूजनासाठी नेतात.

नव्या पिढीची कलेकडे पाठ

या कलेत नवी पिढी न येण्याकडे मागे राहण्यामागे अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे ही कला केवळ दोन महिन्यांसाठी असते आणि दहा महिने बेरोजगार राहावे लागेल, या भीतीमुळे युवा पिढी पुढे येत नसेल, असा अंदाज श्याम आसोलकर यांनी व्यक्त केला.या कलेला जोडधंदा असेल तर मूर्ती बनवण्याची कला युवा पिढी चालू ठेवू शकते. कोरोनाच्या काळात स्थानिक कलाकारांना मूर्ती संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते, पूर्वी अनेक मूर्ती बाहेरील राज्यातून आणल्या जायच्या मात्र आता अनेक गणेश भक्त याच स्थानिक मूर्तिकारांकडून मूर्ती घेतात,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT