Ulhas Tuenkar with Panch Member
Ulhas Tuenkar with Panch MemberDainik Gomantak

Ulhas Tuenkar : नावेलीचा विकास हाच आपला ध्यास

आमदार उल्हास तुयेकर यांचं वक्तव्य; पाचपैकी तीन पंचायतींवर भाजपची सत्ता

Ulhas Tuenkar : नावेली मतदारसंघात आके बायश पंचायत सोडली, तर बाकीच्या चार पंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांना पूर्णपणे आपले वर्चस्व राखता आलेले नाही. स्वतः आमदार तुयेकर म्हणाले, की नावेलीतील पाचपैकी तीन पंचायतींवर भाजपची सत्ता आहे, तरीसुद्धा दवर्ली रुमडामळ व दवर्ली दिकरपाले येथे निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंचांनी आपण स्वतंत्र आहोत, तरी आमदार उल्हास तुयेकर यांचे गावच्या विकासासाठी सहकार्य लाभेल असे म्हटले आहे.

आके बायश पंचायतीत अविनाश सरदेसाई हे सरपंच, तर अमिशा तिळवे उपसरपंच म्हणून निवडून आल्या. नावेलीत उपसरपंच झालेले दामोदर चव्हाण हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले, तर वेलिंडा आफोंसो या पंच सदस्याला भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला होता.

उल्हास तुयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की आम्ही भाजपमध्ये या असा कोणावरही दबाव टाकला नाही. ज्यांना वाटते की सरकार पक्षाला पाठिंबा दिल्यास गावचा विकास चांगला होऊ शकतो त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. उर्वरीत पंच किंवा सरपंच हे कदाचीत नंतर भाजपमध्ये येऊ शकेल. आले नाहीत तरी आपण कसलाही मतभेद करणार नाही. नावेलीचा विकास हे आपले एकमेव ध्येय आहे. सर्व समाजांना बरोबर घेऊन विकासकामे साकारली जातील.

Ulhas Tuenkar with Panch Member
Velankanni : वालंकिणी भाविकांसाठी विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्या

‘विकासासाठी तुयेकरांचे सहकार्य’

रुमडामळ-दवर्ली येथे मुबिना फणीबंद या सरपंच तर मुस्ताफा मेहबूब हे उपसरपंच म्हणून 5-4 अशा फरकाने निवडून आले. सरपंच मुबिनाचे पती व निवडून आलेले पंच मोहमद फणीबंद यांनी सांगितले, की आम्ही जरी स्वतंत्र असलो तरी गावच्या विकासासाठी आम्ही सदैव आमदार उल्हास तुयेकर यांचे सहकार्य घेणार आहे. आम्हाला आरोग्य केंद्र मिळवून देण्याचे आश्वासन आमदार तुयेकर यांनी दिले आहे. दिकरपाले दवर्लीचे सरपंच हेर्कुलान नियासो म्हणाले, की कचरा हा गावचा मुख्य प्रश्न आहे व आम्ही सर्वच पंच एकत्रितपणे हा प्रश्न सोडविणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com