The Akhil Bharatiya Vidyarthi Parishad protested in Panjit saying that the students of Goa were also affected by the NEET paper leak Dainik Gomantak
गोवा

NEET Paper Leak: ‘नीट’ पेपरफुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांनाही फटका; एनएसयूआय, अभाविपचे पणजीत आंदोलन

गोमन्तक डिजिटल टीम

NEET Paper Leak: अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नरत असतात, परंतु यावेळी नीटचा पेपर फुटल्याने पैकीच्या पैकी गुण अनेकांना मिळाले आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला आहे, त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी एनएसयूआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली.

आझाद मैदान येथे आयोजित शांततापूर्ण धरण्यावेळी ते बोलत होते. यावेळी एनएसयूआय संघटनेचे सदस्य तसेच ॲड. श्रीनिवास खलप, समील वळवईकर आदी उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारला विद्यार्थ्यांना झालेल्या या त्रासाबाबत कळवावे व योग्य तो तोडगा काढण्यास भाग पाडावे. अन्यथा या सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाबाबत कोणतीच चिंता नाही असे आम्ही समजू. आमच्या संघटनेद्वारे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना यासंबंधी पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना विद्यार्थ्यांसोबत कायम राहील. असे त्यांनी सांगितले.

सीबीआय चौकशी करा : अभाविप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पणजी बसस्थानकावर नीट परीक्षा निकालाविरोधात आंदोलन केले. सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा संयोजक सन्मई गांवस म्हणाल्या की, काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे अतिरिक्त गुण दिल्याचे सांगितले जाते, मात्र योग्य स्पष्टीकरण दिले जात नाही. यावेळी विनय राऊत, अंशुल सिनारी, कल्पेश वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

SCROLL FOR NEXT