Siolim-Marna Panchayat Dainik Gomantak
गोवा

शिवोलीतील ‘तो’ स्टॉल बेकायदेशीर

सिसीलिया फर्नांडिस: आता न्यायालयात दाद मागणार

दैनिक गोमन्तक

शिवोली: सडये-शिवोली जोडरस्त्यावर चावडीवाडा येथे आपल्या घराला लागूनच असलेल्या दलदलीच्या जागेत सडये येथील श्‍याम वायंगणकर यांच्याकडून बेकायदा स्टॉल (गाळा) उभारण्यात आल्याची लेखी तक्रार स्थानिक सिसीलिया फर्नांडिस यांनी मार्ना-शिवोलीच्या पंचायत कार्यालयात दाखल केली आहे. तसेच तो गाळा तेथून हटवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित स्टॉल बेकायदा ठरवून तो तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश स्थानिक पंचायत मंडळाकडून गाळेधारकास दिलेले असतानाही महिना उलटला तरी त्या गाळ्यावर कारवाई होत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे डेनिस फर्नांडिस यांनी आज (शनिवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दुसऱ्या बाजूने संबंधित गाळेधारक श्‍याम वायंगणकर यांनी सिसीलिया फर्नांडिस यांचे राहते घरच बेकायदा असल्याची परस्पर विरोधी तक्रार मार्ना-शिवोलीच्या पंचायत कार्यालयात दाखल केल्याने शनिवारी दुपारी मार्ना-शिवोली पंचायत मंडळाकडून येथील जागेची तात्काळ पाहणी करून अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती मार्ना-शिवोली पंचायतीचे उपसरपंच विलियम फर्नांडिस यांनी दिली. दोन्ही बाजूंकडील तक्रारींची दखल घेत पंचायत मंडळ कायद्यानुसार कारवाई करेल असे उपसरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.

मार्ना-शिवोली तसेच सडये पंचायत क्षेत्रातील भागांना एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा असलेला येथील जोडरस्ता तसेच तेथील सुशोभीकरणाचा प्रस्ताव 2018 पासून सरकारदरबारी पडून आहे. या भागाचे सुशोभिकरण झाल्यास ज्येष्ठ नांगरिकांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT