Goa Carnival  Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: कार्निव्हल मिरवणुकीतील 'त्या' परेडला पोलिसांनी रोखलं

सिटीझन ऑफ पणजी तर्फे सादर करण्यात येत असलेल्या परेडला पोलिसांनी रोखलं

Ganeshprasad Gogate

आज राजधानी पणजी कार्निव्हल महोत्सवाची धूम सुरु असून दुपारी 3 वा. पाटो पुलाजवळ कार्निव्हल मिरवणुकीला सुरूवात झालीय. वेगवेगळी वेशभूषा, निरनिराळे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे या कार्निव्हलचं मुख्य आकर्षण आहे.

या कार्निव्हल मिरवणुकीत सिटीझन ऑफ पणजी तर्फे पणजीतील अनेक समस्यांवर भाष्य करणारी एक परेड सामील झाली होती. या परेडला पोलिसांनी रोखलं असल्याचे वृत्त हाती येतंय.

सध्या पणजी शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे सुरु आहेत,त्याचा येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात अनेकवेळा येथील नागरिकांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

दरम्यान सिटीझन ऑफ पणजी तर्फे सादर करण्यात येत असलेल्या परेडला पोलिसांनी रोखलं आहे. या परेडमध्ये कोणता संदेश दिला गेला किंवा समस्यांवर भाष्य करणारा चित्ररथ सहभागी झाला होता का या बाबत सविस्तर माहित अद्याप प्राप्त झाली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT