Verna Thar Accident Dainik Gomantak
गोवा

Verna Thar Accident: थारचा पुन्हा थरार; वेर्णात दोन वाहनांना जोरदार धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; क्रेटामधील बालकासह कुटुंब थोडक्यात बचावले

Goa Road Accident: वेर्णा येथील महामार्गावर रविवारी थार, क्रेटा आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: वेर्णा येथील महामार्गावर रविवारी थार, क्रेटा आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. भरधाव थारने प्रथम क्रेटा कारला आणि त्यानंतर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर क्रेटामधील चालकासह त्याची पत्नी व दोन लहान मुले सुदैवाने बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, थार चालक हा बेळगावचा असून वाहन कर्नाटक नोंदणीचे आहे. वेर्णाकडे जात असताना उतारावरील चौकात वाहनावरील ताबा सुटल्याने थारने समोरून जाणाऱ्या क्रेटा कारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर थारने क्रेटाला ढकलत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नेले. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वारालाही थारची धडक बसली. धडकेमुळे दुचाकीस्वार काही अंतर फरफटत गेला. यानंतर थार, क्रेटा आणि दुचाकी ही तिन्ही वाहने रस्त्यालगतच्या उतारावर घसरून खाली गेली. दुचाकी थारच्या खाली अडकली.

गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेटा या कारमध्ये चालकासह त्याची पत्नी आणि दोन लहान मुले प्रवास करत होती. त्यापैकी एक मूल साडेतीन वर्षांचे असून, अपघातात सर्वजण सुदैवाने सुरक्षित बचावले. मात्र त्यांनी अपघाताचा धसका घेतला आहे.

वेगामुळे अपघात?

पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याचा दावा थार चालकाने केला. मात्र, थार भरधाव वेगात असल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप क्रेटा चालकाच्या मित्र अमन यांनी केला. दरम्यान, राज्यात अलीकडे अपघातांच्या घटना वाढल्या असून, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

Cricket Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT