VIDEO: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

Assam Premier League players clash: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा विजयाच्या उत्साहासोबत खेळाडूंमधील शाब्दिक चकमकीही पाहायला मिळतात.
Assam Premier League players clash
Assam Premier League players clashDainik Gomantak
Published on
Updated on

गुवाहाटी : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा विजयाच्या उत्साहासोबत खेळाडूंमधील शाब्दिक चकमकीही पाहायला मिळतात. आता आसाम प्रीमियर लीगमध्ये असाच एक प्रकार घडला असून, या घटनेने क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील जुन्या वादाची आठवण करून दिली आहे. डिब्रुगड वॉरियर्स आणि जोरहाट स्टॅलियन्स यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

विजयी फटका अन् लगेच वादाला सुरुवात

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात डिब्रुगड वॉरियर्सचा फलंदाज साहिल जैन याने विजयी फटका लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, सामना संपताच वातावरण अचानक तापले.

साहिल नॉन-स्ट्रायकर एंडकडून येत असताना जोरहाट स्टॅलियन्सचा कर्णधार स्वरूपम पुरकायस्थ याच्याशी त्याची काहीतरी शाब्दिक देवाणघेवाण झाली. त्यानंतर साहिल संतापलेल्या अवस्थेत कर्णधाराच्या दिशेने गेला. त्याच्या हातातील बॅटही या प्रसंगात दिसत होती. दोघांमध्ये काही काळ जोरदार बाचाबाची झाली.

Assam Premier League players clash
Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

इतर खेळाडूंनी केली मध्यस्थी

परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून दोन्ही संघांतील खेळाडूंनी तातडीने हस्तक्षेप केला. सहकाऱ्यांनी साहिलला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंचा संताप लगेच शांत झालेला दिसत नव्हता.

सामना संपल्यानंतर खेळाडू नेहमीप्रमाणे एकमेकांशी हात मिळवत असतानाही वादाचा परिणाम दिसून आला. या वेळी जोरहाटच्या आणखी एका खेळाडूची डिब्रुगडच्या खेळाडूंशी बाचाबाची झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डिब्रुगडच्या कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंना हस्तक्षेप करून त्या खेळाडूला दूर न्यावे लागले.

कर्णधाराचाही राग शांत होत नव्हता

घटनेनंतर जोरहाट स्टॅलियन्सच्या सपोर्ट स्टाफने कर्णधार स्वरूपम पुरकायस्थ याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बराच वेळ संतापलेल्या अवस्थेत दिसत होता. दोन्ही संघांच्या स्टाफने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर वातावरण शांत झाले.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

डिब्रुगडने सहज मिळवला विजय

या सामन्यात डिब्रुगड वॉरियर्सने जोरहाट स्टॅलियन्सवर प्रभावी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जोरहाटच्या संघाने निर्धारित षटकांमध्ये 8 विकेट गमावत 132 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना डिब्रुगडने 17.4 षटकांतच सामना जिंकला. या विजयात साहिल जैनचा मोठा वाटा राहिला. त्याने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे मिश्रण करत 38 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा केल्या. त्याच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

Assam Premier League players clash
Goa traffic issue: राज्यात वाहतुकीचा मास्टर प्लॅन गरजेचा

विराट-नवीनच्या वादाची आठवण

या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांनी 2023 च्या IPLमधील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वादाची आठवण काढली आहे. त्या सामन्यात मैदानावरील शाब्दिक चकमकीनंतर प्रकरण आणखी चर्चेत आले होते.

आसाम प्रीमियर लीगमधील हा वाद तितकाच मोठा ठरला नसला तरी विजयानंतरही मैदानावर सुरू राहिलेली बाचाबाची आणि हात मिळवतानाचा तणाव यामुळे या घटनेने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com