Mandovi Accident Dainik Gomantak
गोवा

Mandovi Bridge Accident: मांडवी पुलावर भीषण अपघात; दुचाकीचालक गंभीर जखमी

Goa Road Accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार गंभीर जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: पणजीत मांडवी नदीच्या पुलावर आज ( रविवार, दि. २० ऑक्टोबर) रोजी एक भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकी स्वाराने चारचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. बार्देश येथील मसूद सावकार ( वय, ३१) नावाच्या या दुचाकीचालकावर सध्या बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातात दुचाकीचा तर पूर्णपणे चुराडा झालाच आहे मात्र चरचाकीचा देखील टायर फुटलाय. सध्या पणजी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. एक दुचाकीस्वार आजूबाजूच्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने समोर येणाऱ्या चारचाकीला जबर धडक दिली.

जखमी मसूद सावकार यांना त्वरित बांबोळीतील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलीस निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनखाली अपघाताचा तपास सुरु झाला आणि मिळालेल्या माहितीतून हा दुचाकीस्वार बेतीहून पणजीला येत असल्याची तर चारचाकी चालक पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT