Mopa International Airport  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport Inauguration : मोपा विमानतळाच्या लोकार्पणासाठी 11 डिसेंबरची तारीख निश्चित, पण...

लोकापर्णाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे, असे सावंत म्हणाले.

Pramod Yadav

Mopa International Airport Inauguration : उत्तर गोव्यात होत असलेल्या मोपा विमानतळाचे उद्घाटन अनेक दिवसांपासून पुढे ढकलले जात आहे. 15 ऑगस्ट रोजी होणारे उद्धाटन आता डिसेंबरमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. विमानतळाच्या लोकार्पणासाठी 11 डिसेंबर ही तात्पुरती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. पण, लोकापर्णाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. असे सावंत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मोपाच्या लोकार्पणाची घाई झाली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. 'मोपाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, मोपा पूर्णपणे तयार होईल तेव्हा विमानतळाचे उद्धाटन केले जावे ना की मुख्यमंत्री तयार असतील तेव्हा,' अशा शब्दात टीका गोवा फॉरर्वडचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

नावाववरून वाद

मोपा विमानतळाचे लोकार्पण होण्यापूर्वीच त्याच्या नावावरून गोव्यात राजकारण होताना दिसत आहे. महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. तसेच, माजी विरोधीपक्षनेते जॅक सिक्वेरा आणि दिवगंत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी देखील मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Goa Today's News Live: डिचोलीत घुमले 'वंदे मातरम्' गीताचे स्वर

Horoscope: हाच 'तो' दिवस! ‘गौरी योग’ देणार भरपूर यश; 'या' तीन राशींसाठी मंगलवार्ता

Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

SCROLL FOR NEXT