Mopa Airport: मोपा विमानतळाला बांदोडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मांद्रे येथे धरणे

बांदोडकरांच्या पुतळ्याजवळ मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीतर्फे आंदोलन
Mopa International Airport | Goa News
Mopa International Airport | Goa NewsDainik Gomantak

Mopa Airport: गोव्याच्या पेडणे तालुक्यातील जीएमआर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव या विमानतळाला द्यावे, या मागणीसाठी आता मांद्रेवासीयांनी धरणे आंदोलन केले आहे.

Mopa International Airport | Goa News
Jetty Policy in Goa : समुद्रकिनारे संपवण्याचा डाव; जेटी धोरणाला पूर्णविराम द्या

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलकांनी या ठिकाणी जमून सर्वप्रथम बांदोडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर बांदोडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

काही गावांमध्येही या विमानतळाला बांदोडकर यांचेच नाव द्यावे, असे ठराव ग्रामसभेत झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच जीएमआर कंपनीने या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘न्यू गोवा विमानतळ’ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मोपा असा ब्रँड आयडेंटिटी लोगो लॉंच केला आहे.

Mopa International Airport | Goa News
Goa News: गोव्यातही दुर्धर आजारांवर होणार संशोधन- प्रमोद सावंत

डिसेंबरमध्ये विमानतळाचे उद्‍घाटन होऊन जानेवारी 2023 मध्ये येथून देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानांची ये-जा सुरू होणार आहे. विमानतळाला पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी मगोपसह अनेकांची मागणी आहे. भाजपमधील एक गट दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावासाठी आग्रही आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी विमानतळाला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.

मगो पक्षाने केंद्रीय कमिटीची बैठक घेत या विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्यावे असा ठराव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेकांना पत्रे पाठवली आहेत. वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे देखील बांदोडकर यांचेच नाव द्यावे या मताचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com