Mopa Airport: ‘मोपा’साठी जमिनी गेलेल्‍या युवकांना कामावरून काढले

Mopa Airport: सतावणूक : लेबर कोर्टात जाण्‍याचा पीडितांचा इशारा
Mopa Airport |Goa News
Mopa Airport |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport: कोणतेही सक्षम कारण न देता क्षुल्लक कारणावरून तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याचा सपाटा मोपा विमानतळावरील ‘रक्षा सेक्युरिटी’ कंपनीतील एका उच्चपदावरील अधिकाऱ्याने चालविला आहे.

या प्रकल्‍पासाठी जमिनी गेलेल्‍या डझनभर युवकांना आतापर्यंत कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून, लवकरच लेबर कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्‍याची माहिती चांदेल येथील पीडित कर्मचारी रितेश गावस आणि कासारवर्णे येथील ओमकार पालयेकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना रितेश रमेश गावस, चांदेल यांनी सांगितले की, रक्षा सेक्युरिटी कंपनीच्‍या एक वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांची शुल्लक कारणावरून सतावणूक सुरू आहे.

कोणतेही कारण न देता आणि स्पष्टीकरण न घेताच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्‍यात येत आहे. तर, अनेकदा मेमो देऊन त्‍यांची पिळवणूक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रात्रपाळी करून घरी येऊन झोपलो होतो.

त्याचदरम्यान बैठकीला येण्याचा फोनवर मेसेज आला. मात्र झोपेत असल्याने बैठकीत जाऊ शकलो नाही. एवढ्याच कारणावरून मला कामावरून काढून टाकण्यात आल्‍याचे गावस यांनी सांगितले.

ओमकार पालयेकर यांनाही कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याबद्दल माहिती देताना ते म्‍हणाले की, रक्षा सेक्युरिटीमध्ये ड्युटीवर असताना इतर कर्मचाऱ्यांनी मला मारहाण केली होती. हे सांगण्यासाठी मी अधिकाऱ्याकडे गेलो होतो. परंतु माझे ऐकून न घेता उलट मलाच कामावरून काढून टाकण्यात आले.

Mopa Airport |Goa News
Amit Patkar: मोपावरील नोकऱ्यांवरून लक्ष हटविण्यासाठीच नावाचा वाद

काळ्‍या-पिवळ्‍या टॅक्‍सींसाठी स्‍थानक हवे

मोपा विमानतळावर काळ्‍या-पिवळ्‍या टॅक्‍सींसाठी स्‍थानक उभारणे आणि त्‍यास ‘मोपा एअरपोर्ट टॅक्सी स्टँड’ असे नाव देणे, अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी आज पेडणे आरटीओ विभागाला निवेदन सादर करून केली.

या प्रकल्‍पावरील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबरच स्‍थानक अधिसूचित करून काळ्‍या-पिवळ्‍या टॅक्‍सीचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी ताम्हणकर यांनी केली आहे. दरम्‍यान, ताम्‍हणकर यांच्‍यासोबत यावेळी राजू नर्से यांचीही उपस्‍थिती होती.

Mopa Airport |Goa News
Goa News: डाळींचे दर वधारले; मात्र पामतेल उतरले

कोऱ्या कागदावर घेतली जाते सही

मिळालेल्या माहितीनुसार रक्षा सेक्युरिटी कंपनीतील एक उच्चपदस्‍थ अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापूर्वी एका कोऱ्या कागदावर जबरदस्तीने सही घेतो. त्यापूर्वी त्या कर्मचाऱ्यांची मेमो देऊन सतावणूक केली जाते.

रात्रपाळी केल्यास सुट्टीही दिली जात नाही. तसेच सलग 15 दिवस रात्रपाळीसाठी जुंपले जाते. आतापर्यंत सुमारे डझनभर युवकांना क्षुल्लक कारणावरून कामावरून काढून टाकण्‍यात आले आहे. हे युवक लवकरच न्याय हक्कासाठी लेबर कोर्टात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com