heavy police force deployed in Rumdamol Dainik Gomantak
गोवा

Rumdamol : रुमडामळमध्ये पुन्हा तणाव! बंदोबस्तात वाढ

एकास अटक ः मांस विक्री दुकान बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने वाद

गोमन्तक डिजिटल टीम

Rumdamol काही दिवसांपूर्वी हिंदू आणि मुस्लीम यांच्यात झालेल्या वादात पेटलेला रुमडामळ आज एका मुस्लीम व्यापाऱ्याचे मांस विक्री दुकान बंद करण्याचा एकाने प्रयत्न केल्याने पुन्हा तणावग्रस्त झाला.

हे दुकान बंद करण्याचा प्रयत्न केलेल्या रवींद्र रेडकर याला अटक करा, अशी मागणी करून रुमडामळ भागातील मुस्लीम जमाव पोलिस चौकीवर चाल करून गेला. यावेळी पोलिसांनी उद्या रीतसर तक्रार नोंदवून घेऊ असे आश्वासन देऊन जमावाची समजूत काढून वातावरण शांत केले.

ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. रुमडामळ येथे असलेले मांस विक्री दुकान धुऊन बंद करण्याच्या तयारीत तो व्यापारी असताना रवींद्र रेडकर याने तेथे जाऊन त्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमकावण्यास सुरवात केली, असे यासंबंधी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर या भागातील मुस्लीम एकत्र आले व त्यांनी रेडकर याला अटक करा, अशी मागणी केली.

बंदोबस्तात वाढ : रुमडामळ भागात तणाव वाढल्याने या भागात पुन्हा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच जवळच्या घोगळ हाउसिंग बोर्डमध्ये एका मुस्लीम युवकाने एका हिंदू मुलीची छेड काढण्यावरून तेथेही काहीसा तणाव निर्माण झाला. फातोर्डा पोलिसांनी नंतर त्या युवकाला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक अटक केली.

आम्ही तक्रार करूनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत. यासाठी पोलिसांना जाब विचारण्यासाठी आम्ही पोलिस चौकीवर गेलो होतो.

- ओमर पठाण, पंच सदस्य, रुमडामळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Illegal Beef Trafficking: बेळगावहून गोव्यात बेकायदेशीर गोमांस वाहतूक, केरी चेकपोस्टवर 400 किलो मांस जप्त; 27 वर्षीय 'सोहील' पोलिसांच्या ताब्यात

Viral Post: 'तेरा नाम लिया तुझे याद किया...' रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतली, वसीम जाफरने शेअर केला गाण्याचा VIDEO

Gulega worship in Tulu Nadu: ..वराह रूपं दैव वरिष्ठं! इतिहास तुळुनाडुतील ’कोला’ उत्सवाचा

Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

SCROLL FOR NEXT