Road repair works by Panaji Municipal Corporation  Dainik Gomantak
गोवा

Altinho Road Repair: आल्तिनो जॉगर्स पार्क रस्त्याची होणार तात्पुरती डागडुजी; महापालिकेने झटकलेली जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे

Altinho Joggers Park Road: महापालिकेला रस्त्यांची डागडुजी करणे शक्य नसल्याने ती पीडब्ल्यूडीमार्फत करण्याची विनंती केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्‍मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येतील मात्र या योजनेत नसलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम पणजी महापालिकेचे आहे असे सरकारने स्पष्ट केले होते. महापालिकेला रस्त्यांची डागडुजी करणे शक्य नसल्याने ती पीडब्ल्यूडीमार्फत करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आल्तिनो येथील जॉगर्स पार्ककडील रस्त्यांची येत्या १५ दिवसांत तात्पुरती डागडुजी केली जाईल, अशी माहिती आज ॲडव्होकेट जनरल यांनी स्मार्ट सिटीसंदर्भातच्या याचिकेवरील सुनावणीवेळी दिली.

आल्तिनो - पणजी येथील जॉगर्स पार्क व आझाद मैदान येथील पोलिस मुख्यालयासमोरील रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी ही पणजी महापालिकेची आहे, असे ‘पणजी स्मार्ट सिटी’ने स्पष्ट केले होते मात्र महापालिकेने जॉगर्स पार्कची डागडुजी पीडब्ल्यूडी करत असल्याचे सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकली होती.

त्यामुळे या रस्त्याच्या कामावरून असलेल्या संभ्रमामुळे गोवा खंडपीठाने सुनावणी आज ठेवून हे काम कोण करणार, याची माहिती महापालिकेकडे मागितली होती. त्यानुसार महापालिकेने पीडब्ल्यूडीला पत्र पाठवून हे काम करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी मागील सुनावणीवेळी हे काम पीडब्ल्यूडीचे आहे अशी खोटी माहिती खंडपीठाला दिली होती. हे काम पीडब्ल्यूडी करण्यास तयार आहे असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी खंडपीठाला सांगितले.

पणजीतील ११ पैकी ८ परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पणजी स्मार्ट सिटीची आहे. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी येत्या १५ दिवसांत केली जाईल त्यात रायबंदर येथील रस्त्याचाही समावेश असेल. मात्र हे काम पडणाऱ्या पावसावर अवलंबून असेल. आझाद मैदान येथील पोलिस मुख्यालयासमोरील रस्त्याची डागडुजी स्मार्ट सिटीने डांबरीकरण करून केली होती. मात्र, पावसाळ्यापूर्वी पणजी महापालिकेने मलनिस्सारण गटाराचे काम करण्यासाठी हा रस्ता खोदला होता. त्यामुळे त्याची डागडुजी पणजी महापालिकेने करायला हवी, अशी भूमिका सरकारने घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT