Goa Altinho: अल्तिनो-मळा रस्ता खचला; वाहतुकीसाठी बंद

Goa Rain: रस्त्याची बाजू खचल्याने सतर्कतेचा इशारा
Goa Rain: रस्त्याची बाजू खचल्याने सतर्कतेचा इशारा
Goa AltinhoDainik Gomantak

आल्तिनोवरील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीपासून मळ्यात जाणाऱ्या मार्गाचा डाव्या बाजूचा भाग पावसामुळे खचला आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. त्याशिवाय वाहतूक पोलिस शाखेने तत्काळ या भागावरील वाहतूक वळविली असून, त्याठिकाणी पोलिसाची नेमणूक केली होती.

पावसामुळे राज्यभर झाडे पडणे, भूस्खलन, पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. आल्तिनोवरही पावसात झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु यावर्षी मात्र जमीन खचण्याचा प्रकार घडल्याने ही धोक्याची घंटा दिसू लागली आहे. खचलेला भाग हा पदपथाचा असल्याने पोलिसांनी तत्काळ याठिकाणी बॅरेगेट्स लावून वाहतूक वळविली व ती जागा असुरक्षीत असल्याचे दाखविण्यासाठी लाकूड ठेवून सूचित करण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाकडून मळ्यात, सांताक्रूझकडे जाण्यासाठी किंवा सांताक्रूझ, मळ्यातून पणजीत येणाऱ्यांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी अधिक वापरला जात होता. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग वापरात आहे. परंतु या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने सोमवारपासून अनेकांना मळ्यात जाण्यासाठी किंवा मळ्यातून पणजीत जाणाऱ्यांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com