Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जनतेसह राज्यातील मंदिरेही असुरक्षित

लाडफेनंतर कासारपाल, शिरोड्यातही चोरी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime राज्यात गेले कित्येक दिवस चोऱ्या, लुटमारीचे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. झुआरीनगरमध्ये चोरांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला. मंगळवारी तर रात्री दोन मंदिरे फोडून तेथील ऐवज चोरण्यापर्यंत चोरांची मजल गेली.

लाडफे येथील मंदिरफोडीची घटना ताजी असतानाच, पंचायत क्षेत्रातील कासारपाल येथील अन्य एक मंदिर चोरांनी फोडले. मंगळवारी मध्यरात्री कासारपाल येथील श्री सातेरी भूमिका देवीचे मंदिर फोडून फंडपेटीतील 12 हजारांची रोकड चोरांनी लंपास केली.

रविवारी (ता.21) अज्ञात चोरांनी लाडफे येथील श्री महादेव मंदिरातील फंडपेटी फोडली होती. याचा तपास सुरू असतानाच, मंगळवारी कासारपाल येथील मंदिरात चोरी झाली.

आज, बुधवारी सकाळी हा प्रकार पुजाऱ्याच्या लक्षात येताच देवस्थानतर्फे पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

याप्रकरणी डिचोली पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, साकवाळ येथील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांचे रेखाचित्र जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT