Panjim Smart City: कामाबद्दल बाबूश यांचा सरकारला घरचा अहेर; म्हणाले, हे काम...

स्मार्ट सिटी निकृष्ट कामाबद्दल बाबूशकडून सल्लागार लक्ष्य
Babush Monserrate on Smart city work
Babush Monserrate on Smart city work Dainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आणि आता पावसाळा तोंडावर आल्याने पुन्हा संकटात सापडलेले पणजीच्या ‘स्मार्ट सिटी’चे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप दस्तुरखुद्द पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त वक्तव्य करण्यात आणि कुणालाही शिंगावर घेण्यात पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात वाकबगार आहेत. त्यांनी आज, बुधवारी स्मार्ट सिटीचे काम हलक्या दर्जाचे आणि निकृष्ट झाल्याची कबुली देत सरकारलाच धारेवर धरले.

या कामाची सर्वस्वी जबाबदारी सरकारने नेमलेल्या सल्लागाराची (कन्सल्टंट) आहे. यासाठी सरकारने तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे तेच या कामाला जबाबदार राहतील. शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी चांगल्या रितीने पर्यवेक्षणाचे काम करणे गरजेचे आहे.

सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामात लक्ष घातले असून ते दररोज आढावा घेत आहेत. यासाठी त्यांनी ‘स्मार्ट सिटी’चे सीईओ तथा एमडी म्हणून संजीत रॉड्रिग्स यांची नियुक्ती केली आहे. ते या कामात पूर्वीपासून होते. त्यामुळे सध्या तरी मी ‘वेट ॲण्ड वॉच’ भूमिकेत आहे असेही मोन्सेरात यावेळी म्हणाले.

Babush Monserrate on Smart city work
Goa Petrol-Diesel Price: बेळगावपेक्षा गोव्यात डिझेल महाग, पेट्रोल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

सुरुवातीपासूनच गोंधळाची स्थिती

‘स्मार्ट सिटी’चे काम सुरू झाल्यापासून गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. सुरुवातीला हे काम बरेच दिवस रखडले. नंतर विविध खात्यांच्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव होता. काम सुरू झाल्यानंतर पणजी शहरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने रुतण्याची मालिकाच सुरू झाली आहे.

आता पावसाळा तोंडावर आला आहे. अशातच गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. नव्याने टाकलेल्या पाईप योग्यरित्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असून त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Babush Monserrate on Smart city work
Goa ST Reservation: लोहिया मैदानावर आज होणार एल्गार, जमणार 5 हजार समाजबांधव

उत्‍पल बाबूशवर कडाडले

‘स्मार्ट सिटी’च्या कामात मोन्सेरात फॅमिली सुरुवातीपासून आहे. आता प्रकल्पामध्ये त्रुटी दिसून आल्यानंतर बाबूश ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारत आहेत. हा हात झटकण्‍याचा प्रकार झाला, अशा शब्‍दांत उत्‍पल पर्रीकर यांनी बाबूशना खडे बोल सुनावले आहेत.

काम मुख्यमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली

‘स्मार्ट सिटी’च्या कामांमध्ये अनेक खाती सहभागी आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते त्यापैकी एक असले तरी यात ‘जी-सुडा’, वीज खाते, घनकचरा व्यवस्थापन अशी इतर खातीही आहेत.

त्यामुळे सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या कामावर देखरेख ठेवत आहेत. तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असे आज साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com