Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यातील तापमानात होणार वाढ, आयएमडीने वर्तवली शक्यता

येत्या दोन दिवसांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात सध्या पहाटे थंडी, धुकं अशी स्थिती असते दिवसभर कडाक्याचं ऊन अनुभवायला मिळतं. गेल्या दोन- चार दिवसात गोव्यातील ग्रामीण भागात प्रचंड धुकं जाणवलं.

काल तर दाट धुक्यामुळे दाबोळी विमानतळावरील विमानसेवा रखडली होती. फेब्रुवारीच्या 14 आणि 15 तारिखला गोव्यातील तापमान 1-2 अंश सेल्सिअसने घटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मात्र त्या नंतर दोन दिवसांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कमाल तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागत आहे.

गोव्यात आंबा, काजू हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामाकरिता वाढती उष्णता हे वातावरण पोषक मानण्यात येते. मात्र ऋतू बदलामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT