डिचोली: पाठ्यपुस्तकातील ज्ञानाच्या कक्षेबाहेर जाऊन आज विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला वाव देतानाच विद्यार्थ्यांमधून टेकनॉक्रेट ( Technological) निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सोमवारी बोलताना व्यक्त केले.
कारापूर-तिस्क येथे डॉ. के. बी. हेडगेवार विद्यामंदिराच्या स्वतंत्र इमारत प्रकल्पाच्या शिलान्यास समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हेडगेवार शिक्षण संस्थेच्या संस्कारक्षम शिक्षण कार्याची प्रशंसा करून, ही संस्था यापुढेही निश्चितच मोठा शैक्षणिक नावलौकिक प्राप्त करणार. असा आशावाद व्यक्त केला.
या सोहळ्यास मयेचे आमदार प्रवीण झाट्ये, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कारापूर-सर्वणचे सरपंच दामोदर गुरव, डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णराज सुकेरकर, सचिव सुभाष देसाई, शाळेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, मुख्याध्यापक सदानंद मिशाळ, ऍड. नारायण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार झाट्ये यांनी डॉ. के. बी. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक करून, संस्थेला शुभेच्छा दिल्या. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या शाळांमधून केवळ हुशारच नव्हे, तर संस्कारक्षम आणि राष्ट्राचे आदर्श विद्यार्थी तयार होतात. असे सुभाष देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले. पांडुरंग कुर्टीकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शाळेत उभारलेल्या रोबोटीक प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले. सुरवातीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मनोज सावईकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. शिक्षिका प्रज्ञा हिने सूत्रसंचालन केले. स्वाती केरकर यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.