teachers day Soniya Mangaonkar Dainik Gomantak
गोवा

Happy Teachers Day 2023: मराठी, कोकणी प्राथमिक शाळांना हिंदीचा आधार; संवादासाठी भाषेची अडचण

मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार विजेत्या शिक्षिकेने उघड केले वास्तव

दैनिक गोमन्तक

सरकार मराठी, कोकणी माध्यमाच्या प्राथमिक शाळा चालवते. त्या शाळा चालतात, बंद पडतात त्यावरून कोणत्या भाषेचे किती विद्यार्थी याचे मोजमाप केले जाते. प्रत्यक्षात मात्र मराठी, कोकणी शाळेत शिकणारी मुले ही अन्य भाषक असतात.

मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार विजेत्या शिक्षिकेने हे सत्य उघड केले आहे. या पुरस्कारांची घोषणा आज होणार होती, त्यासाठी पुरस्कार विजेत्यांना पर्वरी येथील शिक्षण संचालनालयात पाचारण करण्यात आले होते.

तेथे दै. ‘गोमन्तक’शी बोलताना ए. व्ही. लॉरेन्को - मडगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिका सोनिया माणगावकर यांनी ही वस्तुस्थिती सांगितली.

त्यांनी सांगितले, ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षक म्हणून आपण काम केले आहे. मडगाव शहरात बदली झाली आणि वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मराठी कोकणी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले या दोन्ही भाषा बोलणारी नाहीत.

ती मुले कन्नडसह इतर भाषा बोलतात. त्यांचे पालक परप्रांतीय आहेत. त्या मुलांना हिंदीतून शिकवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना हिंदीतूनच शिकवावे लागते.

याशिवाय शाळेत मुले का पाठवली पाहिजेत हेही पालकांना समजत नाही. ते निरक्षर आहेत. त्या मुलांना शाळेत पाठवा म्हणून झोपडपट्टी गाठावी लागते.

वर्गपाठ आणि गृहपाठ शाळेतच

शाळा व घर यात मुलांच्या दृष्टीने मोठे अंतर असते. घरी गेल्यावर ती मुले विद्यार्थी नसतातच. ती मुले गृहपाठ करत नाहीत. त्यामुळे अशा मुलांचा वर्गपाठ आणि गृहपाठ शाळेतच करून घ्यावा लागतो. त्यातही संवादासाठी भाषेची अडचण मोठी असते.

हिंदीचा वापर करून कसेबसे समजवावे लागते. कधी कधी त्यांना हिंदीतूनही समजावणे कठीण होते. कारण त्यांची ती भाषा नव्हे. त्यांच्या भाषा आम्हाला येत नाहीत. त्यामुळे त्यांना समजतील अशा सोप्या शब्दांचा वापर करून शिकवावे लागते, असे शिक्षिका सोनिया माणगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT