Goa Political News: मंत्रिमंडळ फेररचनेच्या मुहूर्ताची दिल्लीत चर्चा; नेत्यांसोबत बैठकांमुळे राजकीय वारे

CM Pramod Sawant On Goa Cabinet Reshuffle: मुख्‍यमंत्री काशीहून दिल्‍लीत
CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple Dainik Gomantak

CM Pramod Sawant On Goa Cabinet Reshuffle : काशीहून थेट दिल्ली गाठलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन राजकीय भेटी घेतल्याने मंत्रिमंडळ फेररचनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी ही फेररचना होणार असल्याने आता गेल्या 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा हा दिल्ली दौरा केल्याने या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री केंद्र सरकारचा आर्थिक पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपचे राष्ट्रीय संघटन सहसचिव व्ही. सतीश यांनी तीन दिवसांचा गोवा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने राजकीयदृष्ट्या हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे.

मंत्रिमंडळ फेररचनेचा मुद्दाही चर्चेला येणार असल्‍याची चर्चा त्याचमुळे सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर, सरचिटणीस दामोदर नाईक आणि ॲड. नरेंद्र सावईकर, खजिनदार संजीव देसाई, माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी रविवारी सायंकाळी उशिरा काशी गाठली.

सोमवारी सकाळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन श्रावणी सोमवारनिमित्त अभिषेक केला.

CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
Goa Police: भाडेकरू पडताळणी मोहीमेत 11 परप्रांतीय कामगारांवर कारवाई

दिलेली आश्‍वासने अन्‌ अपेक्षा

  1. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो व दिलायला लोबो यांनी दिल्लीतील नेत्यांशी बोलणी केली होती.

  2. त्यामुळे त्यांना दिलेल्या आश्वासनांबाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांना सुरवातीला माहिती नव्हती. यामुळे या आमदारांना पदे देण्याविषयी स्थानिक पातळीवर केवळ दिल्लीतील सूचनेची अंमलबजावणी केली गेली आहे.

  3. त्यातील काही जणांच्या म्हणण्यानुसार त्यांना दिल्लीतील नेत्यांनी मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील भेटीवेळी लोकसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय चर्चेला येऊ शकतो.

राष्‍ट्रीय स्‍पर्धेच्या उद्‍घाटनाची तारीख ठरणार

पंतप्रधानांनी २५ किंवा २६ ऑक्टोबरला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी गोव्यात यावे असा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसा पत्रव्यवहार पंतप्रधान कार्यालयाशी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यानंतर या स्पर्धेच्या उद्‍घाटनाचा नक्की दिवस समजणार आहे, असे मानले जाते.

CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
Vasco Janata Darbar: ''मी दरबारात साष्टांग नमस्कार घालून पाया पडतो''; 'त्यांची' आर्त विनवणी आणि मंत्री झाले निरुत्तर, घडलं असं की...

पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुख्यमंत्री दिल्लीत पोचल्यावर त्यांनी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्ही. सतीश यांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात ही चर्चा झाली. या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

...आणि ठरला बेत, सर्व नेते जमले एकत्र

काशी येथे आपण जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल दुपारी या नेत्यांना सांगितले आणि सायंकाळी तेथे जाण्याचे ठरले. योगायोगाने मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बैठका होत्या. त्यामुळे त्यांनीही या दौऱ्यात सहभागी होण्याचे ठरवले. काशी येथील अभिषेकानंतर दुपारपर्यंत सर्व नेते एकत्र होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com