Goa Accident: बुडताना वाचली, पण अपघातात गेली; बेतूल येथील घटना

रोझारिनाचा बसच्‍या चाकाखाली चिरडून मृत्‍यू
Betul Bus Accident:
Betul Bus Accident: Dainik Gomantak
Published on
Updated on

Betul Accident: दोन महिन्‍यांपूर्वी बेतूल येथे शेतात जाताना पाय घसरून ओहोळात पडल्‍याने तिचा मृत्‍यू तिच्‍या डोळ्‍यासमोर दिसत होता. त्‍यावेळी दैवाची साथ मिळाल्‍याने एका झाडाला पकडून तिने आपला प्राण वाचवला.

मात्र, त्‍याच महिलेला आज बेतूल येथे भाजी विकत घेताना बसने धडक दिल्‍यामुळे मृत्‍यूला सामोरे जावे लागले. बस पाठीमागे घेताना तिला या बसची धडक बसली आणि बसचे चाक तिच्‍या डोक्‍यावरून गेल्‍या तिचा तत्‍काळ मृत्‍यू झाला.

रोझारिना सिमॉईश (वय ६४) या महिलेची ही दुर्दैवी कथा आहे. ही महिला किटल-बेतूल येथे राहणारी असून सकाळी ८ वाजण्‍याच्‍या सुमारास ती भाजी विकत घेण्‍यासाठी बाजारात गेली होती.

यावेळी जीए - ०२ - यू - ४०४६ क्रमांकाच्‍या बसने तिला ठोकरले. बसचालक विलेश लोटलीकर (३७ असोळणा) याला निष्‍काळजीपणे वाहन चालवून मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍यामुळे अटक केली.

Betul Bus Accident:
Goa Politician Scandal: ‘तो’ मी नव्हेच! स्‍वकियांची विरोधकांना फूस : माविन

दैव बलवत्तर म्हणून तेव्हा वाचली होती

रोझारिना ही यापूर्वी ५ जुलै रोजी झालेल्‍या ‘त्‍या’ दुर्घटनेतून नशिबाने वाचली होती. रोझारिना आपली नणंद फ्‍लोरा डायस हिच्‍याबरोबर शेतात जात असताना शेवाळे आलेल्‍या एका पठारावर त्‍या दोघींचेही पाय घसरून त्‍या पाण्याने तुडुंब भरलेल्‍या ओहोळात पडल्‍या होत्‍या.

त्‍यापैकी फ्‍लोरा ही पाण्‍याच्‍या लोटात वाहून गेल्‍याने तिचा बुडून मृत्‍यू झाला. मात्र, रोझारिना हिच्‍या हाती त्‍यावेळी ओहोळातील झाड लागले. त्‍या झाडाला घट्ट पकडून थांबल्‍याने ती आपला जीव वाचवू शकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com