Jharkhand - Goa News Dainik Gomantak
गोवा

Jharkhand: गोव्याला जाऊ दिले नाही म्हणून कॉलेज तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

Jharkhand News: निशीचे वडील टोटो स्कूलमध्ये सरकारी शिक्षक असून, ते गुरुवारी गोव्याच्या दौऱ्यावर जाणार होते.

Pramod Yadav

Jharkhand News

गोव्याला जाऊ दिले नाही म्हणून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले असून, उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुमला, झारखंड येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशी कछाप असे या 20 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. निशी शांती नगर येथील कार्तिक ओराव महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे. निशीला तिच्या बाबांसोबत गोव्याला जायचं होते. पण, बाबांनी नकार दिल्याने तिने टोकाचे निर्णय घेतला.

निशीने अनेक गोळ्यांचे सेवन केल्याने तिची प्रकृती बिघडली, सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

निशी कछाप मूळची घाघरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेला गड्डा गावची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

निशीचे वडील टोटो स्कूलमध्ये सरकारी शिक्षक असून, ते गुरुवारी गोव्याच्या दौऱ्यावर जाणार होते. निशीने वडिलांसोबत गोव्याला येण्याचा आग्रह धरला पण, वडिलांनी त्याला नकार दिला. नकार दिल्याने नाराज झालेल्या निशीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT