Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Goa Taxi Issue Tourist Viral Video: कॅब / टॅक्सी चालकांची गुंडागर्दी सुरु, जिथे भाडं १,५०० ते १,८०० आहे त्याठिकाणी ३००० ते ३,५०० रुपये घेतले जात असल्याचा आरोप या महिलेने केला.

Pramod Yadav

मडगाव: गोव्यातील टॅक्सी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अहमदाबाद गुजरात येथील पर्यटक महिलेला दक्षिण गोव्यात टॅक्सी चालकांनी त्रास देत, ऑनलाईन बुक केलेल्या टॅक्सीत जाऊ दिले नाही. अखेर या पर्यटक महिलेला भर पावसात पाच किलोमीटर पायी चालत जावे लागले. दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी सुरु असल्याचा आरोप या पर्यटक महिलेने केला आहे.

अहमदाबाद, गुजरात येथून आलेल्या पर्यटक महिलेने तिच्यासोबत दक्षिण गोव्यात घडलेला धक्कादायक अनुभवाचे कथन केले आहे. पर्यटक महिलेने याबाबतचा शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महिलेचे दक्षिण गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये ११ ते १५ सप्टेंबरपर्यंत बुकिंग होते. पण, येथे कॅब / टॅक्सी चालकांची गुंडागर्दी सुरु असल्याचा आरोप या महिलेने केला. जिथे भाडं १,५०० ते १,८०० आहे त्याठिकाणी ३००० ते ३,५०० रुपये घेतले जात आहेत. तसेच, ऑनलाईन बुकिंग करुन टॅक्सी बोलवल्यास त्यांना खूप त्रास दिला जात आहे, असा आरोप महिलेने केला.

"पाच दिवस गोव्यात मी खूप आनंदाने घालवले पण, शेवटच्या दिवशी टॅक्सी चालकांनी खूप त्रास दिल्याचा महिलेने आरोप केला. टॅक्सी व्यावसायिकांनी ऑनलाईन बोलवलेली टॅक्सी अडवली, मलाही टॅक्सी बसू दिले नाही. अखेर भर पावसात साहित्याच्या बॅगा घेऊन मी पाच ते सहा किलोमीटर चालत आले आणि नंतर टॅक्सी बूक केली", असा धक्कादायक अनुभव महिलेने सांगितला.

"यापूर्वी देखील गोव्यात आले होते पण, दक्षिण गोव्यासारखा भयानक अनुभव कधीच आला नाही, असे महिला पर्यटक म्हणाली. याठिकाणी गुंडागर्दी सुरुये, पोलिसांची देखील धमकी देण्यात आली", असा आरोप महिलेने केला. "टॅक्सी माफियांनी यापूर्वी देखील त्रास दिल्याचे नमूद करताना यावेळी तर त्यांनी रडवले", असे महिला पर्यटक म्हणाली.

"टॅक्सीवाले अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात आणि पर्यटकांनी वेठीस धरतात, पाच ते सहा हजार रुपये वसूल केले जातात. रिसॉर्टवाले पण काहीच मदत करत नाहीत, बुकिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर रिसॉर्टवाले हात वरती करतात", असे पर्यटक महिला म्हणाली.

"दक्षिण गोव्यातील स्थिती अत्यंत दयनीय आहे, पर्यटक म्हणून तुम्हाला येथे पोलिसांची धमकी दिली जाते. टॅक्सी वाल्यांची तर एकाधिकारशाही सुरु असून, त्यांची लूट सुरुये. ५ किमी असो किंवा १० टॅक्सीवाले तुमच्याकडून ३ ते ४ हजार रुपये घेतात. त्यांचा मीटरच तीन हजारपासून सुरु होतो", असा आरोप या महिलेने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT