Goa Taxi Issue | Sudin Tamhankar Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: पेडणेत काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी आंदोलन; सरकारला 2 जानेवारीपर्यंतची 'डेडलाईन'

Goa Taxi Issue: मोपा विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी काऊंटर सुरु करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Taxi Issue: मोपा विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी काऊंटर सुरू केलाच पाहिजे. आमची मागणी मान्य न केल्यास येत्या 2 जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा काल संध्याकाळी पेडणे येथील श्री भगवती मंदिर आवारात झालेल्या कोपरा बैठकीत देण्यात आला. हक्कासाठी लढा देण्यात येत आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

सुदीप ताम्हणकर, मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर, उदय महाले, भास्कर नारुलकर, पत्रकार किशोर नाईक गावकर उपस्थित होते. संघटनेचे निमंत्रक उदय महाले बोलताना म्हणाले, सरकारने तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जमीन गेलेल्याना प्रकल्पात नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते.

जमिनीचा मोबदला तर मिळालाच नाही पण नोकऱ्यांच्या बाबतीत आमची फसवणूक झाली. मुख्यमंत्री डॉ. सावंतही आम्हाला फसवत आहेत. आम्हाला मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटरसाठी जागा द्यावी, आमचे सगळे हिरावून घेऊन मुख्यमंत्री दादागिरी खपवून घेणार नाही, अशी आम्हांला धमकी देतात. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आमच्या हक्कासाठी आम्हांला लढा द्यावाच लागणार आहे.

मिशन फॉर पेडणेचे निमंत्रक राजन कोरगावकर म्हणाले, मोपा विमानतळासाठी येथील लोकांनी सर्वस्व गमावलेले आहे. इतके करुनही सरकार त्यांची विमानतळावर टॅक्सी काउंटरची मागणी मान्य करत नाहीत, हे माणुसकीला शोभून दिसत नाही. या लोकांनी कसे जगावे, याविरोधात आंदोलनाला सगळ्या पेडणेवासीयांनी पाठिंबा द्यावा.

पेडणेकरांचा भ्रमनिरास

सुदीप ताम्हणकर म्हणाले, नोकऱ्या मिळणार म्हणून मोपा विमानतळाबद्दल पेडणेतील लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याबाबत भ्रमनिरास झाला. स्थानिकांना रोजगार मिळणे त्यांचा हक्क आहे. निदान आता विमानतळावर काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी काउंटर मिळणे गरजेचे आहे. पण सरकार हा हक्कही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मोपा विमानतळावर 5 रोजी विमान उतरणार आहे, असे सांगतानाच सरकार जाहिराती प्रसिद्ध करून गोंधळ घालत आहे. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाबाबत पेडणे तालुक्यात अशा प्रकारे गावोगावी कोपरा बैठका घेऊन जनजागृती करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT