गोवा

Manohar Airport: मोपा विमानतळावर टॅक्सी चालकांचा आता 'रेंट अ कार'ला विरोध

Akshay Nirmale

Manohar Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज, गुरूवार 5 जानेवारीपासून विमानोड्डाणास सुरवात झाली आहे. तथापि, येथील टॅक्सीचालकांचा प्रश्न अद्याप मार्गी लागावयाचा आहे. गोवा टॅक्सी अॅपवर सरकारकडून टॅक्सी चालकांची नोंदणी केली जात आहे. काही टॅक्सी चालकांनी येथे विनाअट टॅक्सी काऊंटरची मागणी केली आहे. त्यावरून काहीजणांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्या पार्श्वभुमीवर काल, 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी मोपा विमानतळ परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केल्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांनी विमानतळावर 'रेंट अ कार' या सेवेस विरोध दर्शविला आहे. केवळ विरोध दर्शवून टॅक्सी चालक थांबले नाहीत तर रेंट अ कार सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना त्यांनी घेरावही घातला. रेंट अ कार सेवा देणाऱ्यांची थेट अडवणूक टॅक्सी चालकांनी केली. टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे रेंट अ कार सेवा देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, विमानतळावर आलेल्या प्रवाशांना टॅक्सीसाठी ताटकळत थांबावे लागले. तसेच, गोवा माईल्सची टॅक्सी बुक करण्यासाठी देखील भलीमोठी रांग लागली होती. दरम्यान, टॅक्सी आंदोलकांनी विमानतळ परिसरात कलम 144 अंतर्गत लागू केलेले जमावबंदीचे आदेश हटविण्याची मागणी केली आहे. टॅक्सी आंदोलकांनी सांयकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहण्याचा इशारा दिला आहे. मोपा विमानतळावर विनाअट टॅक्सी काऊंटरची मागणी मान्य होईपर्यंत नागझर येथे साखळी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ‘टुगेदर फॉर मोपा’तर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT