Manohar Airport: आले विमानाने पण... विमानतळावर टॅक्सीसाठी बोंबाबोंब

विमानाने आलेल्या प्रवाशांना टॅक्सीसाठी विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.
Manohar Airport
Manohar AirportDainik Gomantak

गोव्यात नव्याने सुरू झालेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी 8:40 वाजता पहिले विमान उतरले. हैद्राबाद येथून आलेल्या इंडिगोच्या पहिल्या व्यावसायिक फ्लाईटला विमानतळावर उतरण्याची संधी मिळाली. GMR कंपनी आणि राज्य सरकारच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी पहिल्या प्रवाशांचे विमानतळावर स्वागत केले. पण, विमानाने आलेल्या प्रवाशांना टॅक्सीसाठी विमानतळावर ताटकळत थांबावे लागले. तसेच, गोवा माईल्सची टॅक्सी बुक करण्यासाठी देखील भलीमोठी रांग लागली होती.

दरम्यान, टॅक्सी आंदोलकांनी विमानतळ परिसरात कलम 144 अंतर्गत लावण्यात आलेले जमावबंदीचे आदेश हटविण्याची मागणी केली आहे. टॅक्सी आंदोलकांनी सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्रतिक्षा करणार असल्याचे सांगितले आहे.

Manohar Airport
Manohar Airport: आनंदोत्सव! मनोहर विमानतळावर झाले पहिले व्यावसायिक लॅन्डिंग

नेटवर्क प्रोब्लेम

विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. नेटवर्क मिळत नसल्याने प्रवाशांना टॅक्सी बुकिंग करता आले नाही. तसेच, विमानतळ परिसरात देखील जमावबंदी लागू केल्याने प्रवशांना टॅक्सीसाठी वाट पाहावी लागली. टॅक्सीचा मुद्द्यावर तोडगा निघला नसल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या टॅक्सी चालकांची धास्ती घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे विमानाने आलेल्या प्रवाशांना विमानतळावर टॅक्सीसाठी वाट पाहावी लागली.

Manohar Airport
Mopa Airport: मोपा विमानतळासाठी ‘कदंब’ची बससेवा उद्यापासून

दरम्यान, मोपा विमानतळावर विनाअट टॅक्सी काऊंटरची मागणी मान्य होईपर्यंत नागझर येथे साखळी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ‘टुगेदर फॉर मोपा’तर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे. वाहतूक खात्याने जीएमआर कंपनीला विमानतळावर किती कारची गरज आहे, असे विचारणे चुकीचे आहे. कंपनीने माहिती दिल्यावर वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यासंदर्भात गाड्यांसाठी अर्ज मागवायला हवेत. असेही ताम्हणकर म्हणाले.

'कदंब’ची बससेवा

‘कदंब’ने 6 इलेक्ट्रिक बसेस मोपामार्गावर कार्यरत केल्या आहेत. यात मोपा - पणजी - मडगाव, मोपा - म्हापसा - कळंगुट, मोपा - म्‍हापसा - पणजी या मार्गांवर बसेस सेवा देणार आहेत. मोपा-मडगाव रूटसाठी 500 रुपये शुल्क असेल, तर मोपा-पणजी 250, मोपा-कळंगुट 250, मोपा-म्हापसा 200 असे शुल्क निश्‍चित केले आहे. प्रारंभी हेच दर असतील. मात्र, नंतर आवश्‍यकतेनुसार ते बदलण्यात येतील. मध्यरात्री 1 वा. शेवटची बस मडगाव मार्गावर असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com