Vijay Kenkre Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: 'कला अकादमी'चा अहवाल आठवडाभरात; कृती दलाने पुन्हा घेतला आढावा

Examination of Kala Academy Renovation: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती दलाची मंगळवारी सकाळी बैठक पार पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Task Force Inspection Report

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती दलाची मंगळवारी सकाळी बैठक पार पडली.

त्यात ध्वनी योजना रॉजर ड्रेगो, प्रकाश योजनेविषयी शीतल तळपदे आणि आर्किटेक्टविषयी राजन भिसे यांनी परीक्षण केले आहे आणि ते एका आठवड्यात त्यांचा अहवाल सादर करतील, त्यानंतर तो अहवाल सरकारला सादर होईल आणि त्यावर आम्ही पुढील निर्णय घेऊ अशी माहिती केंकरे यांनी दिली.

गोवा मनोरंजन संस्थेत झालेल्या बैठकीत कृती दलाचे इतर सर्व सदस्य, विविध खात्याचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामानंतर मुख्य सभागृह नाटकांसाठी खुले झाले, तेव्हापासून झालेले काम हे सदोष असल्याची टीका होऊ लागली. या कामाला आक्षेप घेतल्यानंतर राज्यातील नाराज कलाकारांनी कला राखण मांड नावाची संस्था स्थापन केली.

या राखण मांडने वारंवार कला अकादमीच्या कामावर आवाज उठविला, तसेच निर्माण झालेल्या कामातील दोष दाखवून दिले. मांड स्थापन झाल्याने कलाकारांचे दोन गट झाले. परंतु या सर्वात या नूतनीकरणाच्या कामातील दोषाला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याची टीका होत होती. त्यामुळे ते खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीच्या कामांचे परीक्षण करण्यासाठी कृती दलाची स्थापना झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT