Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: पार्से-तुये श्री भगवती देवी पुनर्भेट उद्या तरंगोत्सव सोहळा

Goa Culture: वाड्यावाड्यांवर उभारल्‍या भव्य प्रवेश कमानी

दैनिक गोमन्तक

Goa Culture: तुये आणि पार्से गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवती भगिनींचा पुनर्भेट तरंगोत्सव सोहळा शुक्रवार, 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. यानिमित्ताने दोन्ही गावांत जय्यत तयारी सुरू आहे. यंदा या उत्सवाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

पार्से येथून श्री देवीचा कलश आणि तरंगे यंदा वायडोंगरमार्गे तुये गावात प्रवेश करणार असल्याने कळस आणि तरंगांच्या स्वागतासाठी वाड्यावाड्यांवर भव्य प्रवेश कमानी उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

गेल्या शेकडो वर्षांच्या परंपरेचा भाग असलेला हा उत्सव दोन्ही गावांसाठी एक मोठी पर्वणी असते. दर तीन वर्षांनंतर हा सर्वांत मोठा उत्सव साजरा होतो. या सणानिमित्त दोन्ही गावांतील असंख्य भक्तगण देवीच्या कळसाचा कौल आणि तरंगांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र गर्दी करतात. गुरवाच्या डोक्यावर श्री देवी भगवतीचा कलश आणि सोबत तरंगे अशी ही मिरवणूक पारंपरिक मार्गाने यंदा 27 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निघणार आहे.

वाटेत शेकडो भक्तगण कलश आणि तरंगांचे दर्शन घेतात. तुये येथे सीमेवर तुये ग्रामस्थांतर्फे 28 रोजी मध्यरात्री कलश आणि तरंगांचे विधिवत स्वागत केले जाते. तिथून हा कलश आणि तरंगे तुये गावात नेली जातात. 28 रोजी पहाटे तुयेतील श्री देवी भगवती मंदिरात कलश आणि तरंग दाखल होतात. तिथे दिवसभर भक्तांना कलश आणि तरंगांचे दर्शन घेता येते. यानिमित्ताने विविध धार्मिक विधी होतात.

धूमधडाक्यात आयोजन

28 रोजी संध्याकाळी तुयेतून कलश आणि तरंगे परत आपल्या मूळ पार्से मंदिरात नेली जातील. यंदाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार असून सर्व महाजन, भक्तमंडळींनी सहकार्य करावे, असे आवाहन तुये श्री भगवती पंचायत समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तुयेकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT