Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्‍या मुख्य मार्गावर गुजराती भाषेत होर्डिंग्‍ज

Dabolim Airport: वेगवेगळ्या प्रतिक्रिया : क्रीडा स्‍पर्धा गुजरातमध्ये की गोव्यामध्ये?
Dabolim Airport:
Dabolim Airport:Dainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतार्ह दाबोळी विमानतळाच्‍या मुख्य महामार्गावर गुजराती भाषेत मोठे होर्डिंग्‍ज लावल्याने लोक अचंबित झाले आहेत. याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात असून गुजराती भाषेत होर्डिंग्‍ज का? असा प्रश्न विरोधकांनीही उपस्थित केला आहे.

Dabolim Airport:
Tribal reservation: आदिवासी आरक्षण विषय मोदींसमोर मांडा; मुख्यमंत्र्यांना साकडे

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा सज्ज झाला आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन 26 रोजी फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

दाबोळी आयएनएस हंसा तळावर पंतप्रधानांचे दुपारी आगमन होणार आहे. त्यासाठी कडेकोट बंदोबस्त आहे. आयएनएस हंसा गेट ते वेर्णा महामार्गापर्यंतच्या बंदोबस्ताविषयी आज संध्याकाळी रंगीत तालीम घेण्यात आली.

होर्डिंग्जवरून कडवट प्रतिक्रिया

1 दरम्यान दाबोळी विमानतळ परिसर मुख्य महामार्गावर पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी गुजराती भाषेत मोठा होर्डिग्ज उभारला असून यावर काही जणांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

2 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरातमध्ये होत आहे, की गोव्यामध्ये होत आहे? हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. होर्डिंग्ज कोकणी भाषेत ठेवा किंवा काढून टाका, काही जणांनी अशी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

3 विरोधी पक्ष नेत्यांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकार गुजराथी भाषेत स्वागत करून काय साध्य करू इच्छिते? असा सवाल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com