Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगे-बेंडवाडा पुलाजवळ तणाव! 200 हून अधिक लोक जमले; रस्त्याची योग्य तरतूद न केल्याने संताप

Sanguem Bendwado Bridge: तारीमळ सांगे या प्रभागातील दोनशेहून अधिक महिला पुरुष बेंडवाडा पुलाजवळ एकत्र जमल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: तारीमळ सांगे या प्रभागातील दोनशेहून अधिक महिला पुरुष बेंडवाडा पुलाजवळ एकत्र जमल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगेचे मामलेदार सिद्धार्थ प्रभू आणि पोलिस निरीक्षक धितेंद्र नाईक घटना स्थळी दाखल होऊन परिस्थिती समजून घेतली.

बेंडवाडा येथे नवीन पूल बांधकाम सुरू असून तारीमळवासीयांसाठी रस्त्याची हवी तशी तरतूद न केल्यामुळे बांधकाम अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्याचा आग्रह धरला होता. पण अधिकारी सोमवारी सकाळी १०.३० वाजता येणार असल्याचा संदेश मिळाल्याने गर्दी हळू हळू कमी होत गेल्याने पोलिसांनी समाधान मानले.

सविस्तर घटनेनुसार बेंडवाडा येथील नवीन पूल बांधकाम सुरू असताना तारीमळ येथील चारशेपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या गावाला रस्ता जोडताना त्रुटी ठेवल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाहोता.

‘तू तू मै मै’

कॅरोज क्रुज म्हणाले, आपण रस्ता तयार करण्यासाठी अधिकारी व स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांच्याकडून लोकांसमवेत शब्द घेतला आहे. त्यानुसार रस्ता होईल. दुसऱ्या प्रभागातील नगरसेवकांनी येथे येऊन राजकारण करू नये, असा चिमटा नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांना काढला. त्याला प्रत्युत्तर देताना मेशू डिकॉस्ता म्हणाले, तारीमळ येथील लोकांनी बोलाविल्यामुळेच मी आलो असून मातीवर काँक्रिट घातले जात आहे हे कोणीही पाहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT