Mangrove destruction Tar Mayde river Dainik Gomantak
गोवा

तार, मयडे नदीकिनारी खारफुटीची कत्तल; पावसाळ्यात पूर येण्याची भीती, स्थानिकांच्या जीवाला धोका

Mangrove destruction Tar Mayde river: तार-म्हापसा आणि मयडे नदीकिनारी अत्यंत संवेदनशील ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’ क्षेत्रात शेकडो खारफुटी (मॅन्ग्रोव्हज) झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: तार-म्हापसा आणि मयडे नदीकिनारी अत्यंत संवेदनशील ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’ क्षेत्रात शेकडो खारफुटी (मॅन्ग्रोव्हज) झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटी ही नैसर्गिक पूररोधक भिंत म्हणून कार्य करते. मात्र, तिच्या मोठ्या प्रमाणावरील विनाशामुळे किनारपट्टीवरील गावांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत सरकारी यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून ‘स्टॉप वर्क’ आदेश जारी करावा आणि सर्व बेकायदेशीर बांधकामे, माती भराव व इतर विनाशकारी कामे त्वरित थांबवावीत, अशी मागणी केली आहे.

आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढल्याने मयडे, थिवी, कोलवाळ व आसपासच्या गावांतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

थिवी येथील रहिवासी नेरिसा मिरांडा यांनी गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण व हवामान बदल विभाग तसेच वन विभागाकडे तक्रार दाखल करून तातडीने घटनास्थळी पाहणी करण्याची मागणी केली आहे. खारफुटी नष्ट झाल्याने नदीकाठची धूप, पूर आणि चक्रीवादळांपासून संरक्षण करणारी नैसर्गिक व्यवस्था कोलमडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा!

‘गोवा ग्रीन ब्रिगेड’ या पर्यावरण संघटनेनेही या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संघटनेचे संयोजक आवेर्तिनो मिरांडा यांनी हा प्रकार पर्यावरणाचा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या भागाचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करून खारफुटी पुनर्लागवड करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT