

पणजी: वास्को आणि डिचोली या भागांतील हवेची गुणवत्ता खालावली असून, या दोन्ही भागांतील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी) एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात सादर केलेल्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. वास्को आणि डिचोलीत हवेची गुणवत्ता मागील वर्षाच्या तुलनेत खराब झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वास्को आणि डिचोलीत हवेची गुणवत्ता पूर्णपणे धोकादायक पातळीवर नसली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत या दोन भागांमध्ये स्थिती बिघडली आहे. वास्कोत मुरगाव बंदरातील वाढती मालवाहतूक, मोठ्या प्रमाणावरील ट्रक आणि इतर वाहनांची ये-जा, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ, तर डिचोलीत खाणकामाशी संबंधित वाहतूक, रस्त्यांवरील धूळ, वाढती वाहनसंख्या तसेच बांधकामे आणि इतर विकासकामांमुळे हवेची गुणवत्ता खालावल्याचे अहवालात म्हटले आहे.
गोव्यातील (Goa) बहुतांशी निरीक्षण केंद्रांवर हवा अद्याप राष्ट्रीय हवेच्या गुणवत्ता मानकांच्या मर्यादेत आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यात गंभीर वायू प्रदूषणाची परिस्थिती नसली, तरी वास्को आणि डिचोलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मंडळाने अहवालात नमूद केले आहे. शिवाय, प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी नियमित पाणी फवारणी, बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था, वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर तपासणी, हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या शिफारशीही मंडळाने केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.