Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Salman Khan Goa project news: कांदोळी-सिकेरी येथील ५ ते ७ मीटर रुंदीच्या पारंपरिक रस्त्याचे बेकायदेशीरपणे रुंदीकरण करून तेथे बड्या रिअल इस्टेट प्रकल्पांना आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या नो-डेव्हलपमेंट झोनमधील प्रकल्पाला फायदा पोहोचवला.
Salman Khan Goa project news
Salman KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कांदोळी-सिकेरी येथील ५ ते ७ मीटर रुंदीच्या पारंपरिक रस्त्याचे बेकायदेशीरपणे रुंदीकरण करून तेथे बड्या रिअल इस्टेट प्रकल्पांना आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या नो-डेव्हलपमेंट झोनमधील प्रकल्पाला फायदा पोहोचवला जात असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव, दक्षता संचालक आणि इतर अनेक संबंधित कार्यालयात लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कांदोळीतील (Candolim) रहिवासी ग्लेन फर्नांडिस आणि डेरिक गोन्साल्व्हिस यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची कोणतीही निविदा प्रक्रिया किंवा तांत्रिक मंजुरी घेण्यात आलेली नाही. तरीही घटनास्थळी ‘पीडब्ल्यूडी वर्क इन प्रोग्रेस’ चे फलक लावून सरकारी कामाचा आव आणला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Salman Khan Goa project news
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केवळ रिअल इस्टेट लॉबीचे मोठे प्रकल्प आणि सलमान खान यांच्या एनडीझेड/सीआरझेड क्षेत्रात असलेल्या मालमत्तेला मोठा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठीच हे संपूर्ण बेकायदेशीर काम सुरू असल्याचा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कॅमेरा टीम आणि सोशल मीडिया व्हिडिओचा धाक दाखवून स्थानिक वृद्ध, महिला आणि विधवांवर दबाव आणला जात आहे आणि त्यांच्याकडून पूर्वजांच्या जमिनी मोफत लाटल्या जात असल्याचे नमूद केले आहे.

Salman Khan Goa project news
CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

भूसंपादन कायदा २०१३ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बुलडोझर निर्णयातील’ मार्गदर्शक तत्त्वांचे हे थेट उल्लंघन असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. प्रशासनाने तात्काळ हे काम थांबवून कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Salman Khan High Court Notice Candolim Villa Construction
Drunk Driving
Saligao Waste Plant
Michael Lobo Nazri Resort Demolition
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com