Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Goa BJP vice president post row: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या ‘झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा’ या पोस्टवरून मंगळवारी राज्यातील राजकारण चांगलेच तापले.
Narendra Sawaikar Post Controversy
Narendra SawaikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या ‘झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा’ या पोस्टवरून मंगळवारी राज्यातील राजकारण चांगलेच तापले. विरोधकांनी सावईकर यांच्यावर टीकेची झोड उठवत जाहीर माफीची मागणी केली, तर भाजप त्यांच्या समर्थनार्थ ठाम उभा राहिल्याने दिवसभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

सावईकर यांनी सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ‘एक्स’वर ‘वाळवी’ संदर्भातील पोस्ट केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी या पोस्टवरून वादाला तोंड फुटले. दिल्लीत ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावईकर यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका केल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर तुटून पडले. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी त्यांना २४ तासांची मुदत दिली असून, वॉरेन आलेमाव यांनी सावईकर यांच्या घरावर मोर्चा नेण्याची घोषणा केली आहे.

Narendra Sawaikar Post Controversy
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाईंपासून ‘आप’च्या नेत्यांपर्यंत सर्वांचेच सावईकर यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याबाबत एकमत होते. दुसरीकडे, काहीही घडले नसल्याच्या थाटात सावईकर या साऱ्या वादाला समोरे गेले. ‘झुरळ आणि वाळवीपासून संरक्षण करा,’ एवढाच संदेश दिल्याचे सांगत त्याचा राजकीय अर्थ काँग्रेस का काढत आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपनेही त्यांना खंबीर साथ दिली. पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी काँग्रेसची (Congress) मागणी हास्यास्पद आणि गैरलागू असल्याचे स्पष्ट करत या वादातील हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Congress Working President Sunil Kavathankar
Goa Politics
Sadetod Nayak
Yuri Alemao Goa Rakhan Yatra
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com