Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

Goa Crime News: राष्‍ट्रीयीकृत बँकेच्‍या कुडचडे शाखेत हातचलाखी करून वृद्ध खातेदारांना लाखो रुपयांना लुबाडल्‍या प्रकरणी तन्‍वी वस्‍त हिला कुडचडे पोलिसांनी आज अटक केली. अनेकांना टोपी घातल्‍याची रक्‍कम कोटींच्‍या घरात जाईल, असाही अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tanvi Vast Bank Employee Fraud Case

केपे: राष्‍ट्रीयीकृत बँकेच्‍या कुडचडे शाखेत हातचलाखी करून वृद्ध खातेदारांना लाखो रुपयांना लुबाडल्‍या प्रकरणी तन्‍वी वस्‍त हिला कुडचडे पोलिसांनी आज अटक केली. अनेकांना टोपी घातल्‍याची रक्‍कम कोटींच्‍या घरात जाईल, असाही अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

या प्रकरणात हलगर्जीपणा केल्‍याचा ठपका ठेवून कुडचडे पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक वैभव नाईक यांना दक्षिण गोव्‍याच्‍या राखीव पोलिस विभागात हजेरी लावण्‍याचा आदेश अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिला आहे.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी वस्त हिने २ जुलै २०२४ रोजी रोझालिना कोरीया अँथनी डायस, वोडलेमोल - काकोडा यांना संपर्क साधून सेंट्रल बँके ऑफ इंडिया, कुडचडे शाखेत सोन्याचे दागिने ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे डायस या आपल्या सोन्याच्या वस्तू घेऊन बँकेत आल्या असता, त्या सोन्याच्या दागिन्यांच्या वस्तू तन्वी वस्त हिने बदलून खोट्या वस्तू बँकेत ठेवल्या.

हा प्रकार १८ सप्टेंबर २०२४ रोजी उघडकीस आला. डायस यांच्या नेकलेस, दोन सोनसाखळ्या, पाच बांगड्या, दोन अंगठ्या, एक जोडी कानाची रिंग मिळून सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या सोन्याचा त्यात समावेश होता. तसेच आणखी एका तक्रारदाराच्या संमतीशिवाय मोबाईल बँकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून अंदाजे ५,५०,००० रुपये तन्वी वस्त हिने आपल्या खात्यात वर्ग केले. कुडचडे पोलिसांनी तक्रार दाखल करून याप्रकरणी तन्वी वस्त यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

नजर चुकवून फसवणूक

तन्वी वस्त ज्यांच्या खात्यात जास्त रक्कम असे त्यांनाच घेरून व त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना बँकेत एफडी तसेच इतर खात्यात पैसे जमा करण्यास सांगायची. जेव्हा हे पैसे काढण्यासाठी ते बँकेत यायचे तेव्हा त्यांची नजर चुकवून त्यांच्याच मोबाईलद्वारे आपल्या खात्यात पैसे वर्ग करायची. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसून आल्याने तिने काही लोकांना धनादेश दिले आहेत.

कॅन्सर रुग्णालाही फसवले

तन्वी वस्त ही कुडचडे येथील सेंट्रल बँकेत लोकांना विविध प्रकारची माहिती देण्याचे काम करत होती व त्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून फसवणूक करत होती.

काही ज्येष्ठ नागरिकांनी आपण फसलो गेल्याचे उघडकीस येताच कुडचडे पोलिस स्थानकात जाऊन आपली कैफियत मांडली होती. त्यात एका कॅन्सर रुग्णाचासुद्धा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT