Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Goa Crime News: संशियताने महिलेला लोखंडी रेलिंग डोक्यात घालून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

Pramod Yadav

म्हापसा: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना तीन वर्षापूर्वी हणजूण येथे उघडकीस आली. या प्रकरणातील संशयित दोषी आढळला असून, त्याला दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

अँथनी डिकॉस्ता (३७, रा. रामेश्वरम, तामिळनाडू) असे कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरज गावस यांनी केला.

हणजूण येथे २९ नोव्हेंबर २०२१ रोजी नोएडा उत्तर प्रदेश येथील रहिवासी महिलेला मारहाण करुन विनयभंग केल्याची तक्रार हणजूण पोलिसांकडे प्राप्त झाली. संशियताने महिलेला लोखंडी रेलिंग डोक्यात घालून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

संशयित गुन्हा करुन फारार झाला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली. सखोल तपासाअंती त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायलयासमोर संशयिताविरोधातील आरोप सिद्ध झाले असून, त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपी डिकॉस्ताला दंडासह दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT