Stinez Creek Pollution  Dainik Gomantak
गोवा

Taleigao: ताळगाव ग्रामसभा तापली! सांतिनेझ खाडी प्रदूषण, पिण्याच्या दूषित पाण्यावरुन वादंग; मोन्सेरात समर्थकांकडून चर्चेत अडथळे

St inez Creek Pollution: ताळगाव पंचायतीमध्ये पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमधून दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत असल्याची समस्या सोडवण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: ताळगाव पंचायत क्षेत्रातील सांतिनेझ खाडी मलनिस्सारण प्रदूषण, प्रदूषित पिण्याचे पाणी तसेच शेतातील गवतांना वारंवार लागणाऱ्या आगी या विषयांवरून आज ताळगाव ग्रामसभा बरीच तापली. आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या समर्थकांनी या विषयांवर चर्चा करण्यास मज्जाव केला व वारंवार ग्रामस्थांना विषय मांडण्यास अडथळे आणले.

ताळगाव पंचायतीमध्ये पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमधून दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत असल्याची समस्या सोडवण्यात आली आहे. जुन्या पाईपलाईनऐवजी नवीन पाईपलाईन घालण्यात आली आहे. त्यामुळे सुरळीत स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

सांतिनेझ खाडीमध्ये आजूबाजूच्या इमारतींचे तसेच घरांचे मलनिस्सारण पाईपलाईनमधून सोडण्यात आले होते, त्याची पाहणी करून संबंधितांना दोन महिन्यांपूर्वी नोटिसा बजावून दहा दिवसांची मुदत दिली होती. मात्र, अजूनही कारवाईत तत्परता नसल्याचे आपच्या नेत्या सीसिल रॉड्रिग्ज यांनी प्रश्‍न उपस्थित केला. नोटीस जरी बजावल्या तरी या खाडीमध्ये मलनिस्सारण सोडणाऱ्यांची अधुनमधून तपासणी करावी.

जोपर्यंत ताळगावात मलनिस्सारण वाहिन्या जोडण्यात येत नाहीत, तोपर्यंत नव्या बांधकामांना पंचायतीने परवानगी दिली जाऊ नये. उत्तर गोव्यातील मलनिस्सारणचे टँकर सांतिनेझ येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पात (एसटीपी) येत असल्याने हा प्रकल्प ‘ओव्हरफुल्ल’ होऊन समस्या उद्‍भवली आहे हे निदर्शनास आणून देण्यात आल्यावर पंच सदस्य आग्नेल डिकुन्हा यांनी ही समस्या काही दिवसांसाठी असून लवकरच सोडवली जाईल असे उत्तर दिले.

देशासह गोवा हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अजूनही ओडशेल येथे उघड्यावर शौचास समुद्रकिनाऱ्यावर काहीजण जातात असा प्रश्‍न सीसिल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला व संयुक्त तपासणी करण्याची विनंती केली. तेव्हा पंच सदस्य जानू रोझारिओ हे त्याच प्रभागाचे सदस्य असल्याने ज्या घरातील लोक जातात त्यांची नावे द्या असे सांगितले. मात्र, त्या देऊ न शकल्याने सरपंचांनी या तपासणीस नकार दिला.

आगीच्या घटना टाळण्याचे आवाहन

शेतातील गवताला आगी लागण्याच्या घटना टाळण्याचे आवाहन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले. आगीमुळे झालेल्या धुराच्या लोळामुळे व्हडलेभाट परिसरात असलेल्या इमारतीतील रहिवाशांना त्रास झाला होता व ज्येष्ठ नागरिकांना तेथून हलवावे लागले होते. त्यामुळे मे महिन्यात अशा घटना टाळण्यासाठी पंचायतीने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाला पूर्वकल्पना द्यावी अशी सूचना सीसिल रॉड्रिग्ज यांनी मांडली.

सीसिल रॉड्रिग्ज यांना रोखले

टोंक करंझाळे येथील कामराभाट भागात बरीच अस्वच्छता असून त्यामध्ये पंचायतीने लक्ष घालण्याची सूचना सीसिल रॉड्रिग्ज यांनी केली असता तेथील प्रभागच्या माजी पंच सदस्य बार्रेटो, टोनी बार्रेटो, रेगा पै तसेच जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या समर्थकांनी त्यांना घेरले. प्रश्‍न उपस्थित करण्यास त्यांना अडथळे आणले. यावेळी सरंपचांनी बघ्याची भूमिका घेतली. कामराभाटमध्ये पाय न ठेवलेल्या रॉड्रिग्ज यांनी दिभाभूल करणारे वक्तव्य करू नये असा दम देत माजी पंच सदस्य बार्रेटो यांनी त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.

इमारत कॉम्प्लेक्स व घरांना नोटिसा

खाडीमध्ये सभोवती मलनिस्सारण सोडलेल्या इमारत कॉम्‍प्लेक्स तसेच घरांना नोटिसा बजावून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी नोटीस बजावूनही मलनिस्सारण खाडीत सोडणे बंद केले नाही त्यांची आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने वीज व पाणी जोडण्या तोडण्यात येत असल्याची माहिती ग्रामसभेत पंचायत सचिव गौरीश पेडणेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT