St Inez Creek: खाडी की गटारगंगा? सांतिनेजमध्ये दूषित काळेकुट्ट पाणी; अजगर, मासे सापडताहेत मृतावस्थेत

St Inez Creek Pollution: सांतिनेज खाडीच्या दोन्ही बाजूला कठड्यांचे बांधकाम केले आहे. तरी खाडीत येणारे सांडपाणी बंद झालेले नाही.
St Inez Creek Pollution
St Inez CreekDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सांतिनेज खाडीतील पाण्याचा दूषितपणा आता एवढा वाढला आहे की एखाद्या रासायनिक कारखान्‍यातून रसायनमिश्रीत पाणी बाहेर पडावे, तसे या खाडीचे पाणी काळ्या रंगाचे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या पाण्यात भूचर प्राणी पडल्यास ते मृत पडत असल्याचे दिसून येत आहे.

सांतिनेज खाडीच्या दोन्ही बाजूला कठड्यांचे बांधकाम केले आहे. तरी खाडीत येणारे सांडपाणी बंद झालेले नाही. सध्या सांतिनेज खाडीतील पाण्याचा रंग पूर्णपणे काळा झाला आहे.

St Inez Creek Pollution
Chamarkond River: पोर्तुगीज काळात जलमार्गाचे प्रभावी साधन; आता दुर्गंधी, अस्तित्वच संकटात, गोव्यातील नदीची अवस्था पहा

या खाडीला गटारगंगेचे स्वरूप आले असून, त्यातील गाळ उपसा कधी केला जाणार, असा प्रश्‍‍न उपस्थित केला जात आहे. खाडीत अजूनही कचरा टाकण्याचे सत्र काही बंद झालेले नाही.

St Inez Creek Pollution
Sal River: करोडो रुपये जातात कुठे? पोर्तुगीजकाळापासूनचे वैभव ते गटारगंगा; प्रदूषणामुळे साळ नदीची दुरवस्था

भूचर प्राण्‍यांसमोर संकट

खाडीतील दूषित पाण्यात भूचर प्राणी म्हणजे अजगर, साप, सरडे किंवा इतर प्राणी वाचण्याची शक्यता नाही. ते मृतावस्‍थेत आढळत आहेत. दूषित पाण्यामुळे त्‍यांचे अस्‍तित्‍व संकटात सापडले आहे. शिवाय एसटीपी प्रकल्पाजवळील एका गृहप्रकल्पाचे सांडपाणी गटारात सोडले जात असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Konkani Marathi Language Dispute
Goa Rainfall Deficit 2026
Mhadei Water Dispute
Korean Glass Skin
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com