Vinod Palyekar Dainik Gomantak
गोवा

Vinod Palyekar: माझ्या कारकीर्दीची दखल घेत शिवोलीकरांनी मला पुन्हा मत द्यावे

मार्ना शिवोली येथील क्रुजवाडा तसेच इंग्रज -वाडा प्रभागात प्रचार कार्याची सुरुवात

दैनिक गोमन्तक

शिवोली: गेल्या पाच वर्षाच्या काळातील शिवोली मतदार संघातील माझी राजकीय कारकीर्द पाहाता तत्पुर्वीच्या राजकीय प्रतिनिधींपेक्षा मीच सर्वाधिक विकासकामे केलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Goa assembly Elections) स्थानिक मतदार मला पुन्हा एकदा सेवेची संधी देतील, अशी आशा शिवोलीचे माजी आमदार तथा मंत्री विनोद पालयेकर (Vinod Palyekar) यांनी दै. गोमंतकशी बोलतांना व्यक्त केली.

मार्ना शिवोली येथील क्रुजवाडा तसेच इंग्रज -वाडा प्रभागात आपल्या प्रचार कार्याची सुरुवात केल्यानंतर पालयेंकर बोलत होते. (Vinod Palyekar Latest News Updates)

दरम्यान, गेली अनेक वर्षे मागासलेल्या अवस्थेत राहिलेल्या शिवोलीचा (Siolim) कायापालट करण्याचा निर्धार करीत मी मागच्या वेळी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील राजकीय रणांगणात उडी घेतली होती आणि जनतेच्या सहकार्याने भरघोस मतांनी विजयी झालो होतो. तथापि, जनतेने दाखविलेल्या विश्वासाची परतफेड करताना मतदार संघात पाणी, वीज, रस्ते तसेच अन्य प्राथमिक गरजांची परिपूर्णता करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुर्दैवाने , दोन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या कोविड महामारीच्या (Corona Pandemic) प्रकोपानंतर सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आणि पंचक्रोशीतील मंजूर झालेल्या अनेक विकास कामांना त्यामुळे खीळ बसली.

तशातच राजकीय उलथापालथी नंतर हातचे मंत्रीपदही गेल्याने मनात असूनही राजकीय क्षेत्रात हतबल व्हावे लागले. या गोष्टीची खंत वाटत असल्याचे पालयेंकर यांनी सांगितले. दरम्यान, आज पुन्ह अपक्ष उमेदवार या नात्याने जनतेसमोर जाताना गावोगावी मिळणारा त्यांचा उत्साही प्रतिसाद पाहाता मी अत्यंत भारावून गेलो आहे, मागच्या वेळेपेक्षायंदाच्या निवडणूक प्रचारात स्थानिक तरुण कार्यकर्त्यांची भक्कम फळी आपल्यासोबत आहे.

निष्क्रिय तसेच पडेल उमेदवारांच्या भुलथापांना बळी न पडता स्वाभिमानी शिवोलीकरांनी माझ्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत मला पुन्हां एकदां आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी आणि पंचक्रोशीतील आतापर्यंत अडून राहिलेल्या विकास कामांना वाट करून देण्याचे आवाहन शेवटी विनोद पालयेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT