Savitri Kavalekar: 'भाजपने (BJP) माझ्या कार्याची दखल न घेता एकाच घरात दोन तिकिटे देता येणार नाहीत, असे सांगितले. प्रत्यक्षात भाजपने एकाच घरातील दोन सदस्यांना तिकिटे दिली आहेत. मात्र, मला जाणीवपूर्वक डावलण्यात आले', असे मत सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी व्यक्त करत अपक्ष निवडणूक (Goa Election 2022) लढवण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
सावित्री कवळेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी त्यांचा अजेंडा स्पष्ट केला आहे. त्या म्हणाल्या की, 'या निवडणुकीत विजयी झाल्यास सांगेमधील लोकांसाठी उत्कृष्ट बसस्थानक आणि उत्तम दर्जाची बाजारपेठ (Market) बांधणे हे माझे पहिले प्राधान्य असेल. बांधकामापूर्वी नवीन मार्केटमधील विक्रेत्यांना विश्वासात घेतले जाईल'.
कवळेकर यांनी लोकहितासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे जनतेने आपल्याला एक संधी द्यावी यश इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.