karmal ghat 
गोवा

करमलघाटात बोगद्यातून महामार्ग काढा

Subhash Mahale

काणकोण, : करमल घाटातील चौपदरी रस्त्यासाठी झाडांची कत्तल करण्याऐवजी बोगद्याचा पर्याय स्‍वीकारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. करमल घाटातील गुळे ते बेंदुर्डे पर्यंत या रस्त्यासाठी १४ हजार ४७१ झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामध्ये बहुतेक झाडे जंगल वर्गातील आहे. तसेच हा भाग पश्र्चिम घाटाच्या संवेदनशील विभागात येतो. झाडे कापल्यास हा भाग ओसाड होण्याबरोबरच त्याचा पर्यावणाबरोबरच जैवविविधतेवर परिणाम होणार आहे. त्यासाठी करमल घाटातून रस्ता काढताना बोगद्याच्या पर्याय अवलंबिण्‍यात यावा. हेच पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे मत गोंयकार संघटनेने ‘सेव्ह करमलघाट’ या बॅनरखाली व्यापक चळवळ सुरू केली आहे.

बोगदा हाच योग्य पर्याय : डॉ. नदाफ

जैवसंवेदनशील करमल घाट वाचवण्यासाठी चारपदरी महामार्ग बांधताना कोकण रेल्वेने बोगदा खोदून रेल्वेमार्ग बांधला. त्याप्रमाणे बोगद्यातून महामार्ग काढणे हाच पर्याय योग्य असल्याचे मत श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. एफ. एम. नदाफ यांनी व्यक्त केले आहे. चारपदरी महामार्ग बांधण्यासाठी किमान ४५ मीटर रुंदीची जमीन लागणार आहे. तसे पाहिल्यास करमल घाटात एवढ्या रुंदीच्या रस्त्याची गरज नाही. तीनपदरी रस्त्याचाही पर्याय योग्‍य ठरेल. या भागात महामार्ग बांधणीसाठी बोगदा काढणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच वृक्ष लागवड करून झालेली पर्यावरणाची नुकसानी भरून काढण्याचा हा पर्याय उपलब्ध आहे. करमल घाटाची सर्वोच्च उंची समुद्रसपाटीपासून १५० मीटर आहे. त्यामध्ये काही लहान डोंगर आहेत. हा भाग पक्षी व प्राणी या दुर्मिळ जैवसंपदेने समृद्ध आहे. ती संपदा नष्ट होण्याची भीती डॉ. नदाफ यांनी व्यक्त केली.

इंधन व वेळेचीबचत : नाईक गावकर

करमल घाटातून चारपदरी रस्ता काढण्यासाठी बोगद्याच्या पर्याय सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांची इंधन व वेळेची बचत होणार आहे. तसे न करता रस्त्याला समांतर रस्ता काढल्यास येथील वन्य प्राण्यांना स्थलांतर करण्यास अडथळा निर्माण होऊन आपला जीव गमवावा लागणार आहे. सध्‍याच्‍या महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केल्यास त्याचा फायदा करमल घाटातील अंतर्गत भागातील रहिवाशांना होईल. त्यासाठी सरकारने व तज्ज्ञांनी बोगदा निर्माणकरण्याच्या पर्यायावर विचार करण्याची मागणी काणकोण पालिकेचे माजी नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी केली आहे.

चेतन देसाई यांचीही

बोगद्याची मागणी

करमल घाटातून रस्ता काढताना तो बोगद्यातून काढावा. ज्यामुळे करमल घाटाचे जैविक अस्तित्व अबाधित राहणार आहे. चारपदरी रस्त्यासाठी सुमारे पंधरा हजार झाडांची कत्तल केल्यास येथील पर्यावरण संतूर न बिघडून त्याचा दीर्घकालीन अप्रत्यक्ष परिणाम काणकोण तालुक्यावर होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चेतन देसाई यांनी व्यक्त केली आहे.

संपादन हेमा फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT