Babush Monserrate | Panaji Smart City
Babush Monserrate | Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City Project: त्या’ कंत्राटदारावर कारवाई करा!- बाबूश मोन्सेरात

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City Project: राजधानी पणजीमध्ये सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. परंतु कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

स्मार्ट सिटीची कामे विविध खात्यांमार्फत देण्यात आली असून एखाद्या कंत्राटदाराने दुय्यम दर्जाचे काम केले, तर त्या कंत्राटदारावर संबंधित खात्याने कारवाई करावी.

मात्र, एकदा काम पूर्ण झाल्यानंतर त्यात बिघाड झाल्यास सरकार कारवाई करील, असे महसूलमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

पर्वरी येथील विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. फेरीबोट धक्क्याजवळ सुरू असलेल्या कामात सिमेंट कॉंक्रिटसाठी कामगार मांडवी नदीचे खारे पाणी वापरत असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित कंत्राटदार समोरच उभा राहून हे पाहात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत सध्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच हे प्रकरण समोर आल्याने सरकारवरील टीकेचे प्रमाण वाढले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT